ylliX - Online Advertising Network

Nashik Coronavirus Update नाशकात करोनाचा दुसरा रुग्ण; दिल्ली प्रवासाचा इतिहास

नाशिकमध्ये करोनाचा दुसरा रुग्ण आढळला असून करोना बाधितांची संख्या दोनवर पोहचली आहे. त्यामुळे नाशिकमध्येही करोनाने हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे असे म्हणता येईल. Nashik Coronavirus Update

राज्यभरात करोनाचे बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक करोना व्हायरसपासून सुरक्षित आहे असे वाटत होते. मात्र मागील आठवडयात लासलगावमध्ये एक रुग्ण करोना पाॅझिटिव्ह सापडला होता. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. पहिला रुग्ण उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली आहे.

आता नाशिकमध्ये करोना लागण झालेला दुसरा रुग्ण सापडला आहे. तत्काळ या 44 वर्षीय व्यक्तीवर कथडयातील डाॅ. झाकिर हुसैन रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आल्याचे समजते. या व्यक्तीच्या संपर्कात जे लोक आले आहेत त्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.

नाशिक शहरातील मनोहर नगर येथील 44 वर्षांचा रहिवासी असून आग्रा येथे रेल्वे कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भात गेलेला होता. त्यांस दिनांक 4 एप्रिल 2020 रोजी नाशिक शहर पोलिस आयुक्त यांच्याकडुन प्राप्त झालेल्या यादीनुसार महानगरपालिकेच्या आरोग्य पथक व पोलिस पथकाने त्या घरी जावुन त्यांस घरातुन घेवुन दिनांक 4 रोजी सायंकाळी 4 वाजता डॉ. झाकीर हुसेन महानगरपालिका रुग्णालय, नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले.

त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपाराणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून तो कोरोना विषाणु बाधित असल्याचा निष्कर्ष आलेला आहे.

सदर रुग्णाची तब्येत स्थिर असुन त्याला कोरोना आजारासंबंधी येथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडुन उपचार करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात आपला बाहेरील प्रवास इतिहास असेल तर स्वतःहून प्रशासनाशी संपर्क करावा अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील अशी ताकीद दिली आहे. तसेच तबलिकिच्या धार्मिक सोहळ्यास जिल्ह्यातील जे लोक गेले असतील त्यांनी स्व:ताहून जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला याबाबत माहिती द्यावी. तसेच जे लोक तबलिकींच्या संपर्कात आले असतील त्यांनी देखील प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करावे. माहिती लपविल्याचे निदर्शनास आल्यास करोना संसर्ग पसरविल्या प्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल केले जाईल, असा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

तबलिकिंची माहिती गोळा करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी रवींद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टीम नियुक्त केली आहे. तबलिकिनी व त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी या टीमकडे माहिती द्यावी. त्यासाठी ९८३३३८९९९९ यानंबरवर संपर्क साधावा.

नाशिककरांनी घाबरून न जाता केवळ नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. Nashik Coronavirus Update

महापालिकेची अशी तयारी

कोरोनाचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे असताना महापालिकेमार्फत तयारी सुरू आहे.

या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत विशेष काळजी घेण्यात येत आहे. सदर नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाच्या टिम तयार करण्यात आल्या असुन सदर टिममध्ये आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांचा समावेश असुन प्रत्येक 4 टीम मागे 1 वैद्यकिय अधिकारी आणि पर्यवेक्षक असणार आहे.

तसेच जिल्हा स्तरावरील साथरोग नियंत्रण कक्षातील टीम सर्वेक्षणाचे संनियंत्रण करणार आहे. या सर्वक्षणातुन श्वसन संस्थेच्या आजाराच्या सर्व रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. व गरज असलेल्या रुग्णांना योग्य तो उपचार करण्यात येणार आहे.

त्यातील श्वसनसंस्थेच्या आजाराची लक्षणे आढळल्यास त्या रुग्णांस जिल्हा स्तरावरील विलगीकरण कक्षामध्ये उपचारासाठी बोलावुन घशाचा नावाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात येणार आहे व उपचार केले जाणार आहे.

तरी नागरीकांनी कोणत्याही प्रकारे घाबरुन जावु नये. सर्वांनी घरातच राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, नाशिक ग्रामीण विभागाच्या पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी केले.

नाशिक शहर पोलिसांचे ट्विट

Nashik City Police (@nashikpolice) Tweeted: नाशिक मध्ये आणखी एक कोरोना रुग्ण सापडला आहे. संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये व प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे तसेच सोशल मीडिया वर आक्षेपहार्य अफवा पसरवणे समाजामध्ये भीती निर्माण करणारे व्हिडीओ संदेश प्रसारित करण्यात येऊ नये असे आवाहन नाशिक पलिसांंकडून करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.