ylliX - Online Advertising Network

Nashik Corona Village Checkup कोरोना बाधित रुग्णाच्या गावातील लोकांची तपासणी

जि.प. आरोग्य विभाग : २० टीमचे पथक

नाशिक : लासलगाव नजीकच्या पिंपळगावमध्ये करोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे जिल्हाप्रशासन अॅक्शनमोडमध्ये आले असून करोना बाधित रुग्णाच्या गावातील सर्व नागरीकांची करोना संसर्ग चाचणी केली जात आहे. जिल्हा परीषद आरोग्य विभागाची २० जणांचे पथक घरोघरी जात तपासणी करत आहे. Nashik Corona Village Checkup

संसर्गाची लक्षणे आढळल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेउन त्यांचे नमुने तपासणीसाठि पाठवले जाणार आहे.

पिंपळगाव नजीक येथील 30 वर्षाच्या बेकरी व्यवसाय करणार्‍या तरुणाला करोना विषाणूचा संसर्गाची लागण झाली आहे. जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

यामुळे लासलगावमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित रुग्ण अनेकांच्या संपर्कात आला असून त्यामुळे इतरांना करोनाचा संसर्गाची भिती आहे. ते बघता जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत लासलगावमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

रुग्ण ज्या गावात राहतो तेथील लोकसंख्या 6800 इतकी आहे. आरोग्य विभागाच्या एकूण 20 टीम तयार करण्यात आल्या असून प्रत्येक टीम मध्ये चार सदस्यांचा समावेश आहे. त्यात आशा, अंगणवाडी कार्यकर्ती ,आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांचा समावेश असून प्रत्येक चार टीम मागे एक वैद्यकीय अधिकारी आणि परिवेक्षक असणार आहे.

तसेच जिल्हास्तरावरील साथरोग नियंत्रण कक्षातील टीम सर्वेक्षणाचे सनियंत्रण करणार आहे या सर्वेक्षणातून श्‍वसनसंस्थेच्या आजाराच्या सर्व रुग्णांचा तपासणी करण्यात येणार आहे. गरज असलेल्या रुग्णांना योग्य तो उपचार करण्यात येणार आहे. Nashik Corona Village Checkup

महत्वाचे मुद्दे :
  • करोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १६ जणांना जाकिरहुसेन रु्ग्णालयात क्वारन्टाएन करण्यात आले आहे.
  • रुग्णाचे सर्व कुटुंबिय, २ डाँक्टर व ३ पँथलाँस्टिचा सामावेश आहे.
  • रुग्णास संसर्ग कसा झाला याची माहिती घेतली जात आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.