ylliX - Online Advertising Network

Nashik Corona Red Zone चर्चांना विराम : नाशिक मनपासह सात तालुक्यांत रेड झोन, उर्वरित ऑरेंज

नाशिक : मागील 21 दिवसात कोरोना रुग्ण आढळून आल्याने स्थानिक जिल्हा प्रशासनास दिलेल्या अधिकारानुसार नाशिक महानगरपालिका, देवळाली कन्टोनमेंट क्षेत्र, मालेगाव महानगरपालिका क्षेत्र उर्वरित मालेगाव तालुका, निफाड, चांदवड, सिन्नर, येवला, नांदगाव तालुक्यांच्या क्षेत्रांमध्ये एकंदरीत परिस्थितीचा सारासार विचार करून त्या क्षेत्रास रेड झोन असे घोषित करण्यात येत असून त्यामुळे या तालुक्यांमध्ये १७ मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी स्पष्ट केले केले. Nashik Corona Red Zone

राज्य शासनाने रेड व ऑरेंज झोन बाबत ज्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत त्या जिल्ह्याला लागू असून जिल्हा प्रशासनाने त्यात कोणताही बदल केला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

परंतु मद्याची दुकाने खुलणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलेली नसली तरी झोन नूसार अटिशर्ती लागू लागू असणार असल्याचे निर्गमित करण्यात आलेले असून मद्य विक्री सुरू होण्याची चिन्हे आहेत.

रेड झोन मधील शासनाकडून निर्गमित झालेल्या अटिशर्ती वरील क्षेत्रास लागू असेल. तर पेठ, सुरगाणा, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबक, कळवण, देवळा व बागलाण हे तालुके ऑरेंज झोनमध्ये असणार आहेत. त्या ठिकाणी मूळ अधिसूचनेत ऑरेंज झोन मध्ये देण्यात आलेली सूट व अटिशर्ती लागू राहतील.

त्यामुळे नाशिक जिल्हा किंवा शहर रेड झोन मध्ये की ऑरेंज याबाबत नाशिकरांमध्ये दिवसभर चर्चा होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राज्य शासनाने सर्व विभागीय अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक जिल्हानिहाय आढावा घेत करोनाचा प्रभाव नसलेल्या जिल्हयांमध्ये काहीशी शिथीलता दिली. राज्य शासनाने झोन नुसार शिथीलता दिली असली तरी रेड झोनमध्ये मात्र जीवनावश्यक वस्तू वगळता लॉकडाउनचे नियम कायम राहणार आहे.

शासनाने दिलेल्या सुधारित अधिसूचनेनुसार जिल्ह्याची अधिसूचना थोड्याच वेळात निर्गमित करण्यात येत आहे.
शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे व त्या अधिसूचनेत समाविष्ट असलेल्या प्रतिबंधित व सुट असलेल्या बाबींमध्ये जिल्ह्याच्या स्तरावर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

रेड झोन मध्ये अनुज्ञेय असलेल्या बाबी शासनाकडून निर्गमित झालेल्या अधिसूचनेत उल्लेखित आहेत. उर्वरित संपूर्ण जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असणार आहे व त्याठिकाणी मूळ अधिसूचनेत ऑरेंज झोन मध्ये अनुज्ञेय असलेल्या तसेच प्रतिबंधित असलेल्या बाबी लागू राहतील.

ही माहिती अधिसुचने संदर्भात ढोबळ कल्पना यावी म्हणून दिली आहे तपशिलवार अधिसूचना आज रात्री उशिरा संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल असे स्पष्टपणे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात संयम पाळून आठ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण निर्माण होऊ दिला नाही, त्यामुळे हे तालुके ऑरेंज झोन मध्ये समाविष्ट करता आले. उर्वरित तालुक्यांमधील रुग्ण देखील लवकर बरे होऊन रुग्ण संख्या शुन्यावर येईल. रेड व ऑरेंज झोनबाबत शासनाने दिलेल्या गाईडलाईन्स जिल्हयात जशेच्या तश्या लागू केल्या जाणार आहे.

तसेच उर्वरित तालुके मात्र ऑरेंज झोन घोषित करण्यात आले असून शासन निर्देशानुसार या क्षेत्रात काहीअंशी शिथीलता देण्यात येईल असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले. Nashik Corona Red Zone

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.