Third wave Oxygen Plan तिसऱ्या लाटेत धोका बघता ऑक्सिजन साठ्याचे नियोजन करा

नाशिक : तिसऱ्या लाटेची शक्यता तसेच डेल्टा प्लस, लॅम्बडा यासारखे कोरोनाचे नवे व्हेरीयंटचे संक्रमण लक्षात घेता ही लाट थोपविण्यासाठी ऑक्सिजन साठ्याचे नियोजन करा असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. Third wave Oxygen Plan

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात शुक्रवारी (दि.९) जिल्हा व शहरातील कोरोना सद्यस्थिती आणि कोरोना पश्चात आजारांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.

भुजबळ म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात सुरू करण्यात आलेले उद्योग, कंपन्या संभाव्य तिसऱ्या लाटेत सुरू राहण्यासाठी त्यांना लागू करण्यात आलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. त्याकरीता उद्योजकांनी कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था तेथील जवळच्या परिसरात करण्यात यावी अथवा त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करावी. यासर्व गोष्टींचे नियोजन उद्योजकांनी केले आहे किंवा कसे याबाबतची सविस्तर माहिती औद्योगिक क्षेत्राशी संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील बैठकीत सादर करावी.

त्याचप्रमाणे जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी मंजुर करण्यात आलेले सर्व ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. हे प्रकल्प सुरू करण्यापूर्वी या प्रकल्पांमध्ये भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत किंवा कमतरता राहणार नाही, यासाठी सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता करून घेवून त्यांच्या गुणवत्तेची पडताळणी करणे गरजेचे आहे, अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या.

मोठ्या स्वरूपातील उद्योग व संस्था हे सामाजिक दायित्व म्हणून निधी उपलब्ध करून देत असतात. हा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांच्या बैठका घेण्यात येवून सीएसआरचा निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांना करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.बैठकीत महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस यंत्रणा तसेच आरोग्य विभाग यांच्यामार्फत करण्यात आलेल्या कामांची व पुढील नियोजनाची माहिती सादर करण्यात आली.

ग्रामीण भागात रुग्णसंख्या अधिक

शहरी भागातील कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येपेक्षा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढलेली आहे, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामीणस्तरावर काम करणारे तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्या मदतीने नियोजन करण्यात यावे. याकरीता ग्रामीण भागात लग्न सोहळ्यांना परवानगी देते वेळी लग्न समारंभासाठी निर्धारीत केलेल्या उपस्थितांच्या संख्येचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच लग्नासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान तपासणीसह त्यांना मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य करण्यात यावे. त्यानुसार ग्रामीण भागात गर्दी होणार यासाठी नियोजन करण्यात यावे.

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक करण्यात यावी, असे आदेश भुजबळ यांनी दिले. तसेच लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा त्यातून कोणीही गरजु वंचित राहणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे, असे भुजबळ यांनी सांगितले. Third wave Oxygen Plan

हेही वाचा 👇

दहा दिवसांनंतर निर्बंधांबाबत निर्णय : भुजबळ

●●●●●_________●●●●●

आम्हाला फेसबुक वर फॉलो करा.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.