Nashik Corona Market Bandh कोणी दादागिरी करून बंद केलेला चालणार नाही : भुजबळ

नाशिक : राज्य सरकार ‘मिशन बिगिन अगेन’ वर ठाम असून नाशिकमध्ये लाॅकडाऊन पुन्हा शक्य नाही. लोकांचा संयम संपत असून आर्थिक चणचणीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोणीही दादागिरी करुन दुकाने बंद ठेवू नये, असा सज्जड दम पालकमंत्री भुजबळ यांनी स्वयंघोषित नेत्यांना दिला. सगळं सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून लाॅकडाऊन हवा असेल तर पंतप्रधान मोदींना सांगा, असा टोला त्यांनी भाजपचे नाव न घेता लगावला. Nashik Corona Market Bandh

शासकिय विश्रामगृह येथे शुक्रवारी (दि.२६) पालकमंत्री भुजबळ व व्यापारी संघटनाची बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. महाराष्ट्र चेंबर आॅफ काॅमर्सने वेळ मागितली म्हणून बैठक घेतली. सम विषम नियम काढुन टाकावा या व्यापारी वर्गाच्या मागणीवर अजोय मेहता यांच्याशी फोनवर बोललो आहे.

मुख्यमंत्र्यांनी लाॅकडाउन उठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता लाॅकडाऊन अशक्य आहे.मागील काळात अर्थचक्र बंद पडले होते. लोकांकडे पैसे नाही. बंद करायच असेल तर मोदींना सांगा सगळा देश बंद करु असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

सरकारने सगळी दुकाने सुरु केली असून कोणीही दादागिरी करायची नाही असा दम त्यांनी भरला. दुकाने किती वेळ सुरु ठेवायची याचा निर्णय व्यापार्‍यांनी घ्यावा. पण जीवनावश्यक दुकाने सुरु ठेवावेच लागतील असे भुजबळ यांनी ठणकावले. (असे भुजबळ सरकारच्या बाजूने बोलत असले तरी नाशिक मधील शिवसेना नेत्यांनी मात्र भाजपच्या नेत्यांना साथ देत बाजारपेठांमध्ये फिरून दुकाने बंद करण्यास सांगत आहेत. – प्रत्यक्ष स्थिती अशी आहे.) Nashik Corona Market Bandh

लाॅकडाउन उठल्यावर बाहेरुन लोक नाशकात आले. त्यामुळे रुग्ण वाढत आहे. खासगि रुग्णालयात दोन दिवसात डॅश बोर्ड लावला जाईल. जेणेकरुन रुग्णालयात किती जागा आहे याबाबत गोंधळ उडणार नाही असे त्यांनी सांगितले. पडळकरांच्या टिकेचा समाचार घेतांना पवारांवर बोलणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे. करोना व निसर्ग संकटातही ते एका तरुणासारखे काम करत आहे. प्रकाशझोतात येण्यासाठी काहि लोक असे उदयोग करतात असा टोला त्यांनी लगावला.

महत्त्वाचे मुद्दे –
 • महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने वेळ मागीतली होती म्हणून बैठक
 • वेळेची मर्यादा आणि सम विषम दुकान सुरू असलेला नियम काढून टाकण्याची मागणी.
 • याबाबत अजोय मेहता यांच्याशी लगेच फोनवर बोललो.
 • P1 , P2 बंद केले तर रुग्ण वाढता हा अनुभव आहे
  – मुख्यमंत्री यांनी अनलॉक करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आम्ही लॉकडाऊन करा असं म्हणणार नाही.
 • जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित पडणार नाही याची काळजी घ्या.
 • आधीच नियम ठरवून दिलेले आहे, ते नियम बदलायला सांगता ते आम्ही करू शकत नाही.
 • राज्याला एकच नियम आहे, शहरांसाठी वेगवेगळे नियम नाही.
 • लोकांना खायला पैसे नाही हातामध्ये, लोक आत्महत्या करताय.
 • बंद करायचे तर सांगा मोदी सायबांना, सगळा देश बंद करू
 • सगळीकडे पेशंट वाढताय, घ्या निर्णय.
 • बंद करण सोपं आहे, लोकांचं अर्थचक्र बंद पडलंय.
 • भाजपा आमदारांना आणि मनपा सत्ताधाऱ्यांना टोला.
 • सरकारने सगळं सुरू केलं आहे, कुणीही दादागिरी करायची नाही.
 • नियम पाळणे गरजेचे आहे, विदाऊट मास्क असेल तर काहीही मिळणार नाही.
 • मेहरबानी करा, कोरोनाशी लढतांना मोदी साहेबांनी आदेश केले आहे.
 • लॉकडाऊन उठल्यावर बाहेरून लोक नाशिकमध्ये आले
 • मुंबई, पुणे आणि परदेशातून लोक नाशिकमध्ये आले
 • रुग्ण वाढत आहे, मात्र ठराविक टप्प्यांनंतर ते कमी होतील असे तज्ज्ञांचे म्हणणं.
 • लॉकडाऊन सुरू ठेवावं असं लोकांचं अजिबात म्हणणं नाही.
 • खाजगी रुग्णालय –
 • कोणत्या रुग्णालयात किती जागा आहे, कोणत्या व्यक्तीशी संपर्क करायचा याबाबत दोन दिवसांत डॅशबोर्ड लावला जाईल.
 • यापुढे तो गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या.
 • साडेसहा लाख टन मका खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय
 • त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
 • राम विलास पासवान यांच्याशी रेशन बाबात बोलतोय.
 • पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहे, जागतिक पातळीवर उलट कमी होत आहे.
 • राज्यात अनेक लोक मोठे आहेत, त्यांनी मोदी साहेबांना सांगायला पाहिजे.

पडळकर यांच्या वक्तव्यावर –

 • पवारांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखं आहे
 • इतक्या आजारांवर मात करत आजही काम करत आहेत.
 • कोरोना, निसर्ग वादळात काम केलं,
 • एवढं दुखणं असतांना देखील काम करताय, तरुणांना लाजवेल असे काम.
 • आम्ही मत्र्यांपेक्षा ते जास्त काम करताय, ते सर्वाधिक बिझी.
 • क्रिकेट मध्ये गेले तर ते देशाचे अध्यक्ष झाले आहे.
 • प्रकाशात येण्यासाठी असे काही लोक करतात
 • आम्हीच नाही असे सगळ्या पक्षाचे लोक निषेध करत आहे
 • असं यापुढे कोणी काही बोलणार नाही असं काही करायला हवं.

Nashik Corona Market Bandh

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.