ylliX - Online Advertising Network

पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांची बदली; विश्वास नांगरे पाटील नवे आयुक्त

नाशिक शहरात गुन्हेगारांवर कारवाईसह विविध सामाजिक आणि खेळ या विषयावर विविध प्रकारे कार्य करून लोकप्रिय झालेले डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची नाशिक शहर पोलीस आयुक्त पदावरून बदली झाली आहे. Nashik City Police Commissioner Singal Transferred New CP Vishwas Nangare Patil

याचवेळी आणखी आनंदाची बाब म्हणजे संबंध मराठी तरुणाईत लोकप्रिय असलेले सध्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील हे नाशिक शहर पोलीस आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा काल मध्यरात्रीपासून सुरू होती.

डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची बदली औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली झाल्याचे वृत्त आहे.

विश्वास नांगरे पाटील (५ ऑक्टोबर, इ.स. १९७३; कोकरूड, शिराळा, सांगली – हयात) हे महाराष्ट्र पोलिसातील 1995 बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या कोल्हापूर भागात पोलीस महानिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. मुंबईवर २६ नोव्हेंबर, २००८ रोजी झालेल्या हल्ल्यांच्या वेळी ताज हॉटेलात शिरणारे ते पहिले पोलीस अधिकारी होते. त्याबद्दल नांगरे यांना 2015 साली राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले आहे.

नांगरे पाटील हे एक हुशार आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. तसेच ते नवीन विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.

 

महानगर पालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नंतर पुन्हा एकदा नाशिकला एक लोकप्रिय आणि प्रामाणिक, धडाडीचा अधिकारी अनुभवण्याची संधी यामुळे प्राप्त झाली आहे.

Nashik City Police Commissioner Singal Transferred New CP Vishwas Nangare Patil
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.