दोन मुलांचा बंधाऱ्यातील खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू

येवला  तालुक्यातील धानोरे येथील दोन युवकांचा गावातील बंधारा वजा खड्ड्यात बुडून दुर्दैवी  मृत्यू  झाला आहे.  या घटनेत  मनोज काशिनाथ कांबळे (वय १६) व अनिल अर्जुन राजपूत (वय १५) अशी दोघा मृत तरुणांची नावे आहेत.  दोघे काल गुरुवार रोजी दुपारी शेळ्या  चारण्यासाठी गेले असता घरी परतले नाही. त्यामुळे त्यांची गावातील ग्रामस्थांनी त्यांची  शोधाशोध केली असता गावाच्या पूर्वेला असलेल्या तळ्यासारख्या खड्ड्याजवळ त्यांच्या चपला व कपडे सापडले होते.  मुलांचा तपास लागलेला नसल्याने मुले कदाचित तळ्यात बुडाल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. पोलीस पाटील संदीप कांबळे यांनी पोलिसांना कळविले असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अंधार असल्याने गुरुवारी शोधकार्य थांबवण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी शोधकार्य सुरु केले असता त्याठिकाणी या दोघांचे मुतदेह पाण्यात आढळून आले. दरम्यान दोन्हीही मुलांची घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असून काशीनाथ कांबळे यांना दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला असून मुले मजुरी करून शेळ्या सांभाळून गुजराण करत आहे. दोघांचे मृतदेह बाहेर काढले असता दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली होती, एका मुलाला पोहता येत होते व दुसऱ्याला वाचविताना दोघेही बुडाले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. येवला ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.