नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंकच्या शहर बससेवेची नवीन भाडेवाढ दि. १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. यामुळे नाशिककर प्रवाशांना यापुढे अधिकचे तिकीट दर मोजावे लागणार असून, शहरी भागात दोन ते पाच रुपये, तर ग्रामीण भागासाठी सुमारे १० रुपयांची भाडेवाढ झाली आहे.nashik city link bus news
- अखेर भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला
सिटी लिंक बससेवेचा ताेटा दिवसंेंंदिवस वाढत चालल्या इंधन दरवाढीचे कारण देत तब्बल ५ ते ११ टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी (दि. १५) मध्यरात्री पासून ही वाढीव भाडेदर लागू करण्यात करण्यात येणार आहे. नाशिक महानगर परिवहन महामंडळ स्थापन करत सिटी लिंकच्या माध्यमातून पालिकेने शहरी व ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरु केल्या आहे. मात्र या बससेवेमुळे पालिकेला माेठा अर्थिक ताेटा सहन करावा लागत आहे. सिटीलिंकचा ताेटा हा साधारणत: ८२ काेटी रुपयांवर पाेहाेचला आहे.
दिवसेंदिवस वाढणारा ताेटा कमी करण्यासाठी अखेर भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरी भागातील फेऱ्यांवर ५ टक्के तर ग्रामीण भागातील फेऱ्यांवर ११ टक्के अशी सरासरी ७ टक्के भाडेदरवाढी करण्यात आली. यापूर्वी १ जानेवारीला भाडेवाढ करण्यात येणार हाेती. मात्र आता ही भाडेवाढ १५ फ्रेबुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.
- इंधनदरातील वाढ आणि वाढणारा आर्थिक तोटा
इंधनदरातील वाढ आणि वाढणारा आर्थिक तोटा लक्षात घेता नाशिक महानगर परिवहन महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेत त्यास मंजुरी दिली होती. महामंडळाच्या नियमानुसार दरवर्षी साधारणपणे पाच टक्के भाडेवाढ करता येते. परंतु, महामंडळाला होणारा तोटा आणि इंधनदरवाढ लक्षात घेता महामंडळाने पाचऐवजी सात टक्के तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेत त्यास मंजुरी देऊन तो प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला होता. पाच टक्क्यांऐवजी अतिरिक्त दोन टक्के वाढ असल्याने हा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीने जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी दीड महिन्यांपूर्वी सादर केला होता. मात्र, याच कालावधीत पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने भाडेवाढीचा प्रस्ताव अडकला होता. २ फेब्रुवारीला आचारसंहिता उठताच प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या भाडेवाढीला हिरवा कंदील दिला. यामुळे १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू करण्यात आली.nashik city link bus news