ylliX - Online Advertising Network

नाशिकवर माझे प्रेम, 370 चा निवडणुकीशी काय संबंध – राज ठाकरे

नाशिकमध्ये गेल्या ३० वर्षात जे काम नाही झालं. ते मी पाच वर्षात केले. त्यानंतर जो पराभव झाला, तो माझ्या जिव्हारी लागला होता. आमच्या सर्व सहकारी मित्रांनी मनापासून शहराच्या विकासाठी काम केले. इतके काम केल्यानंतरही पराभव झाला. मग काम मोजतोय कोण, कामांची तुम्हाला किंमत नसेल तर करायचे काय?  

 नाशिकमधील रस्ता स्मार्ट रस्ता म्हणून दोन वर्षापासून खोदून ठेवला आहे.  व्यापारी वर्गाच्या दिवाळीची वाट लावली आहे. सत्तेत बसले बेफिकीर आहेत. नाशिकमध्ये काम करायला पाहिजे होते की नव्हते, मग कशाला पाहिजे निवडणुका असा सवाल करत माझे नाशिकवरचे प्रेम कमी झालेले नाही. पुन्हा संधी द्या उत्तम काम करेल असे आवाहन राज ठाकरे यांनी नाशिकराना केले आहे.

 राज पुढे म्हणाले की, त्यावेळी नाशिकचे खड्डे राहिले नव्हते. तुमच्यावर बोझा नको म्हणून मी बाहेरून पैसे आणले होते. टाटा, रिलायन्स यांनी  दुसऱ्या कुठल्याही शहरात अशा स्वरूपाचे काम केले असेल तर दाखवा असे भावनिक होत राज यांनी नाशिककराना सवाल विचारले.

निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. हेलिकॉप्टरचा प्रवास टाळतो. वैजापूर येथे जाताना आज मला सह्याद्री पाहून उर भरून आला. मात्र आज महाराष्ट्र थंड बसला आहे, असा सह्याद्रीला प्रश्न नक्की पडला असेल.  जी पक्ष आगोदारची सरकारे येतात नवीन आली तरी तुम्ही थंड बसला आहोत.  एचएएलचा कर्मचारी संपावर आहे. हा  विषय काही आजचा नाही.  आमचा कामगार रडतोय कारण पगार मिळत नाही म्हणून कंपनी दुसऱ्याच्या घशात हे सरकार  घालत आहे. तर दुसरीकडे राफेलचे काम अनिल अंबानीला देतात त्यामुळे कामगार देशोधडीला लागला असे ठाकरे म्हणाले.शिवसेना भाजवर आणि मुख्यमंत्री यांच्यावर टीका :राज्यात शिवसेना भाजपा ताटवाट्या घेऊन फिरत आहेत. आम्ही १० रु जेवण देणार कोणी ५ रुपयात देणार. असे चित्र पाहून वाटते की  महाराष्ट्र काय भिकेला लागला आहे का?  उद्धव ठाकरे यांची नक्कल करत त्यांच्यावर जागा वाटपावरून जोरदार टीका केली. अमित शहा हे  ३७० कलमाचा उहापोह करतात, आम्ही कलम हटवले म्हणून अभिनंदन करतो. मात्र या कलमाचा आणि  राज्याच्या निवडणुकीशी काय सबंध, काश्मीर मध्ये काय करताय, किती काश्मिरी पंडित काश्मिरला गेले आकडे सांगा, आधी काश्मीर सुधार करा असे म्हणत अमित शाह यांच्यावर टीका केली.

नोटाबंदीच्या निर्णय चुकला की देश खड्ड्यात गेला समजा अस मी म्हटले होते, त्यात अनेकांनी जीव गमावला मात्र तेव्हा  ५० दिवस मागितले होते, ते सुद्धा संपून गेले, त्याचे पुढे काय जाहले. बनर्जी यांना नोबेल मिळाले त्यांनी देखी सांगितले की  देशाची आर्थिक स्थिती चांगली नाही. कोणाला तरी लहर येते आणि निर्णय घेतले जातात. असे राज म्हणाले.

मुख्यमंत्री यांच्यावर नाव न घेता टीका :

राज यावेळी म्हणाले की जगात कोणतीही गोष्ट शक्य नाही ? फक्त पुरुष गरोदर होणे अजून शक्य नाही. मात्र काही आपल्याकडे गरोदर असल्या सारखे फिरतांना दिसतात. तेव्हा सभेत लोकांनी अनेकांची नावे घेतली. तेव्हा फडणवीस असे नाव येताच,तुम्हाला कळलंय ना मग बस असे म्हणून राज यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.