नाशिकला येणार सीएटचा प्रोजेक्ट गेला तामिळनाडूला, छगन भुजबळ यांची सरकारवर टीका

सीएटला नाशिकच्या उद्योग क्षेत्रात जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे त्यांचा

नवीन रोजगाराभिमुख प्रकल्प तामिळनाडूत गेल्याने भुजबळांनी उद्योग मंत्र्यांचे वेधले लक्ष ……

नाशिक एमआयडीसीत येणारा सीएटचा मोठा नवीन प्रकल्प तामिळनाडूला गेल्याबाबत तसेच ईपीरॉकच्या जागेसाठी निर्णय घेवून या कंपनीची नाशिकमध्ये गुंतवणूक आणण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. याबाबत या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून या कंपन्यांची गुंतवणूक नाशिकमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी छगन भुजबळ यांना दिले.

+91 88304 86650, +91 9689754878

          छगन भुजबळ यांनी उद्योग मंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कीनुकत्याच झालेल्या मॅग्नेटीक महाराष्ट्र या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेमध्येही सीएट कंपनीने त्यांच्या नवीन प्रकल्पाची गुंतवणूक नाशिकमध्ये करण्याबाबत विचार केला होता. पण एमआयडीसीने जागा उपलब्ध करून न दिल्याने हा प्रकल्प तामिळनाडूमध्ये गेला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि तामिळनाडूचे सरकार यांच्यात या नवीन प्रकल्पाबाबत चार हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार झाला आहे. सदर प्रकल्पामुळे एक हजार पेक्षा जास्त रोजगार उपलब्ध झाला असता. नाशिकमधील महिंद्र अॅन्ड महिंद्रबॉशसीएट यासारख्या कंपन्यात रोजगारांना सर्वात मोठा रोजगार मिळतो. त्यामुळे कंपन्यांतील गुंतवणूक भविष्यात वाढून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. या कंपन्यांची भविष्यातील गुंतवणूकसुद्धा नाशिकमध्येच व्हावी यासाठी प्रयत्न करणे ही काळजी गरज आहे. चार वर्षापूर्वीच एमआयडीसीने जागा नाकारल्याने सीएटचा एक प्रकल्प नागपूरला गेला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

+91 88304 86650, +91 9689754878

          ते म्हणाले कीस्वीडिश  कंपनी ईपीरॉकने नाशिकमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला. कंपनीअंतर्गत कामही सुरु झाले असले तरी त्यांना जागा कमी पडत असल्याने त्यांनी एमआयडीसीकडे कंपनीला लागून असलेल्या जागेची मागणी केली. त्याबाबत एमआयडीसीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मंत्रालयात प्रस्ताव पाठवला आहे. मात्र शासनाकडून याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मॅग्नेटिक  महाराष्ट्र परिषदेमध्ये सीएट कंपनीने नाशिकबाबत विचार केला होता.मात्र हा नवीन प्रकल्प नाशिकमध्ये आणण्यासाठी उद्योग विभाग आणि एमआयडीसी हे कुठे कमी पडते आहे याबाबत चौकशी व्हावी तसेच ईपीरॉकच्या जागेसाठी निर्णय घेवून या कंपनीची नाशिकमध्ये गुंतवणूक आणण्याकरिता कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी उद्योग मंत्र्यांकडे केली आहे. यावर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत आपण स्वतः लक्ष घालणार असून या कंपनीची गुंतवणूक नाशिकमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी भुजबळांना दिले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.