Nashik Brahmagiri illigal Excavation ‘ब्रम्हगिरी’ अवैध उत्खनन; ठेकेदारास दीड कोटीचा दंड

Nashik : नाशिकची शान असलेला, गोदावरीचे उगमस्थान ब्रम्हगिरी पर्वत रांगेतील डोंगरावर अवैधरित्या उत्खनन करणार्‍या ठेकेदाराला जिल्हाप्रशासनाने दीड कोटीचा दंड ठोठावला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत प्रकरण पोचले होते. या खळबळ उडवून देणाऱ्या प्रकारणात सबंधित ठेकेदाराने दोन हजार ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केले आहे. Nashik Brahmagiri illigal Excavation

चोरट्यांची नजर

अनेक दुर्मिळ वनस्पती असलेल्या पर्यावरण व जैवविविधतेच्या दृष्टीने हा डोंगर अत्यंत महत्वपूर्ण आहे. मात्र येथील अमूल्य अशा गौण खनिजावर चोरट्यांची वक्रदृष्टी या डोंगरावर अनेक वर्षांपासून आहे.

पर्यावरण प्रेमी आक्रमक

या आठवड्याच्या सुरुवातीला दिवसाढवळ्या जेसीबीने हा डोंगर पोखरण्याचे काम सुरू असल्याचा प्रकार स्थानिकानी व पर्यावरण प्रेमींनी उघडकीस आणला. पर्यावरणप्रेमी आक्रमक झाल्याने थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष घातल्याने सुस्त झोपलेल्या प्रशासनाला कारवाईचा बडगा उगारला. प्रांत व तहसिलदारांनी तत्काळ पथक पाठवत या चोरट्यावर कारवाई करत त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून तसेच त्याचा जेसीबी जप्त केला.

दीड कोटींचा दंड

दरम्यान, चौकशी पूर्ण करत या अवैध उत्खननन प्रकरणी दीड कोटीचा दंड आकारण्यात आल्याची माहिती त्र्यंबक व इगतपुरीचे प्रांत तेजस चव्हाण यांनी दिली आहे.

Nashik Brahmagiri illigal Excavation contactor bumped with one and half crore fine

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.