ylliX - Online Advertising Network

बंद पडलेला लेझर शो अखेर होणार सुरु

अखेर लेजर शो सुरु : राज यांचा महत्वकांक्षी प्रकल्प

नाशिक : मनसेची महापालिकेतून सत्ता गेली आणि राज ठाकरे यांनी सुरु केलेल्या अनेक प्रकल्पावर मनपाने दुर्लक्ष केले होते. यामध्ये रतन टाटा यांच्या सहाय्याने राज यांनी पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या नेहरू वनोद्यानातील बॉटनिकल गार्डनमध्ये  उत्तम असा लेझर शो सुरु केला होता. मात्र मनपाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि तो बंद पडला. नागरिकांनी नाराजी दाखवतातच तो पुन्हा सुरु आणि आता ठ्र्केदाराचे ठेका संपला म्हणून बंद पडला होता. मात्र नागरिकांची नाराजी नको म्हणून ‘कथा अरण्याची’ हा प्रकाश योजनेचा आविष्कार अर्थात लेझर शो दि. १ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार असून आहे. आता या शोची जबादारी वनविभागावर आहे. पालिका आयुक्तांसमवेत वनविभागाच्या अधिका-यांची बैठक होऊन त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून वनविभागाच्या नेहरू वनोद्यानात बॉटनिकल गार्डन साकारण्यात आले आहे. वृक्षसंवर्धनाचे निसर्गाचे काय  महत्त्व आहे हे  पटवून देणारा ‘कथा अरण्याची’ हा लेझर शो सुरु केला होता. लेझर शो हे या गार्डनचे प्रमुख आकर्षण असल्याने सायंकाळी नागरिक खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या लेझर शोचे कंत्राट दि. ३१ डिसेंबरला संपले होते.

वनविभागाच्या कर्मचा-यांना शो दाखविण्यासाठी प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला असून येत्या १ फेबु्रवारीपासन लेझर शो पुन्हा एकदा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. ‘कथा अरण्याची’ हा लेझर शो हिट असून चार महिन्यांत सुमारे ८६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “बंद पडलेला लेझर शो अखेर होणार सुरु

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.