नाशिक : अडीच वर्षाच्या मुलाला त्याचे वडील दुचाकीवरुन घेऊन जात असताना अचानकपणे सुनील देविदास मराठे यांचा दुचाकीवरील एम.एच.३९ के ५२२५ ताबा सुटला होता. त्यामुळे समोरील घंटागाडीवर दुचाकी जाऊन आदळत, धडकेत छातीस जबर मार लागल्याने अडीज वर्षीय रुद्रांश मराठे चा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी सविस्तर वृत्त दिले आहे की, अंबड लिंकरोडवरून सातपूरकडे जात असताना दत्त मंदिर चौफूलीवर मराठे यांचा दुचाकीवरील ताबा सुटला होता, दुचाकी रस्त्यावरुन पुढे जात होती, त्यावेळी घंटागाडीला जाऊन शनिवारी दि.१९ दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास धडकली होती. या धडकेत दुचाकीवर वडीलांसोबत जात असलेल्या रुद्रांशचा उपचार घेत होता तेव्हा मृत्यू झाला आहे. दुचाकीचालक मराठे यांनी यावेळी हेल्मेट परिधान केलेले नव्हते, असे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. याप्रकरणी सुनील भालेराव (२७, रा.प्रबुध्दनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.