Nashik Bazar नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिक बाजार हे मोबाईल आप्लिकेशन

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरात कोरोना वाढू नये या दृष्टीकोनातून नाशिक बाजार हे मोबाईल आप्लिकेशन सुरू केले आहे.नाशिक बाजार मोबाईल ॲपद्वारे किराणा माल घरपोच मिळणारकोरोना या घातक संसर्गजन्य आजाराचे पार्श्वभूमीवर सर्वाना घरातच थांबावयाचे आहे.असे असले तरी जिवनावश्यक व दैनंदिन गरजेच्या वस्तू सर्वाना मिळाव्या यासाठी नाशिक महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.Nashik Bazar
किराणा दुकानामध्ये होणारी गर्दी थांबावी, लोकांना घरपोच माल मिळावा यासाठी नाशिक महानगरपालिका तर्फे व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीक्लचर यांचे संयुक्त विदयामानेअलट्रालिएंट इन्प्फोटेक ने नाशिक बाजार हे मोबाईल ॲप सर्वासाठी मोफत उपलब्ध आहे.
या ॲपमध्ये नाशिक मधील किराणा दुकानादारांनी व नागरिकांनी नोंदणी करुन त्यावर आपल्या मालाची मागणी नोंदविल्यावर त्याभागातील दुकानदार आपले ऑर्डर नोंदवुन मालाची घरपोच डिलीव्हरी करेल.
नागरिकांनी व दुकानदारानी या सुविधेचा लाभ घ्यावा व दुकानातील गर्दी कमी करावी असे आवाहन नाशिक महानगरपालिका व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीक्लचर वतीने करण्यात येत आहे. Nashik Bazar
सदर ॲप हे नाशिक मनपाच्या www.nmc.gov.in या संकेतस्थळावर व प्ले स्टोअर वर (Play Store) Nashik Bazzar या नावाने उपलब्ध आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.