ylliX - Online Advertising Network

रखडलेली विमानसेवा पुन्हा सुरु मुंबई, पुणेसाठी बुकिंग सुरु

नाशिक : नाशिकमध्ये सुरु झालेली विमानसेवा काही काळासाठी बंद झाली होती, मात्र आता ती पुन्हा सुरु झाली असून विमान कंपनीने बुकिंग आणि वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या आठवड्यात  शुक्रवार दि.२० पासून वेळापत्रकानुसार नियमित सेवा सुरु होणार आहे.

ग्राहकांच्या मागणीनुसार ओझरहून सकाळी 6 वाजता विमान मुंबईच्या दिशेने उड्डाण घेणार आहे. हे उडान झालेले विमान  6 वाजून 50 मिनिटांनी मुंबईत पोहोचनार आहे. पुन्हा दुपारी 4 वाजून 55 मिनिटांनी मुंबईहून उड्डाण घेतलेले विमान पावणे सहाला नाशिकमध्ये पोहोचणार आहे.

तर नाशिकहून पुण्याला 6 वाजून 5 मिनिटांनी विमान उड्डाण घेणार असून, पुण्याहून नाशिकच्या दिशेने 7 वाजून 5 मिनिटाने विमानाचे उड्डाण होणार आहे. रात्री पावणे आठला नाशिक ओझर येथे येणार आहे. या आगोदर  तांत्रिक कारण, पायलटची कमतरता, तर कधी स्लॉटची मर्यादा या अनेक कारणांनी विमानसेवा बंद पडली होती. या विमानसेवेसाठी एअर डेक्कनने वेबसाईटवर 20 एप्रिलपासूनचे बुकिंग सुरु केले आहेत.

नवीन वेळापत्रकानुसार उद्यापासून सेवा सुरळीत सुरु होणार आहे.  लोकांचा ओघ वाढावा यासाठी सवलतीच्या दरात काही तिकीटं ठेवले आहेत. निवडक प्रवाशांना अवघ्या 573 रुपयात मुंबई गाठता येणार आहे.

वेळापत्रक

ओझर-मुंबई : सकाळी 6 वा, 6.50 ला मुंबईत

मुंबई-ओझर: दुपारी 4 वाजून 55 मिनिटांनी मुंबईहून उड्डाण, पावणे सहाला नाशिक

ओझर – पुणे – 6.5 मिनिटांनी उड्डाण, 7.05 मिनिटांनी पुणे

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.