ylliX - Online Advertising Network

Nashik Administration Action Mode 600 डाॅक्टर, 1200 नर्सेसला व्हेंटिलेटर हाताळणी प्रशिक्षण

नाशिक करोना संकट : प्रशासन ॲक्शन मोड मध्ये Nashik Administration Action Mode

कोरोना विषाणूचा एक रुग्ण आढळून आल्याने नाशिक जिल्ह्यात शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. हा रुग्ण शहरात ऐवजी ग्रामीण भागात आढळून आल्याने जिल्हा प्रशासन खडबडून कामाला लागले आहे. या कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी इमर्जंन्सी ऑपरेशन सेंटर ॲक्शन मोडमध्ये आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी 600 डॉक्टर्स व 1200 नर्सेस यांना व्हेंटिलेटर हातळणीचे प्रशिक्षण दिले जात आहे.

नियोजनबद्ध कृती आराखडा (एसओपी)आणि या काळात घेण्यात येणारी अत्यावश्यक काळजी या महत्वाच्या घटकांची माहिती दिली जात असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

कोणतेही परदेश वारीचा इतिहास नसलेल्या निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये एका व्यक्तिला करोनाची लागण झाली असून त्याचा तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. करोना संसर्ग तिसर्‍या टप्यात असून त्याचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. Nashik Administration Action Mode

ते बघता जिल्हयात वैद्यकिय सेवेचे बळकटीकरण व कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या अनुषंगाने अत्यावश्यक असलेली आरोग्य विभागातील साधन सामुग्री, उपकरणे, मनुष्यबळ यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांनी सर्व आदेश निर्गमित केले असून लवकरच सर्व आवश्यक साहित्य उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी 600 डॉक्टर्स व 1200 नर्सेस यांना व्हेंटिलेटर हातळणी व उपचाराचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच या संकटात नाशिक मेडिकल असोसिएशनची देखील मदत घेतली जात आहे. ‘आयएमए’चे जिल्हास्तरीय प्रतिनिधी व मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या एस.एम.बी.टी. वैद्यकीय ल तज्‍ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबाबत नियोजन सुरु आहे.

तब्बल 200 खाटांचे क्वारंटाईन हाॅस्पिटल

देवळाली कॅम्पमधील बेन्स स्कुल येथे 200 खाटांचे क्वारंटाईन हॉस्पिटल तयार करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून दातार जेनेटिक लॅब एजन्सी, आयसीएमआर संचालकांसमवेत क्वारंटाईन टेस्टींगबाबत चर्चा सुरू आहे.

पाच हजार एन-95 मास्क, 50 हजार थ्री लेअर मास्क, 1 हजार एक्स-रे फिल्मस् मुंबई येथुन मागविण्यात आले आहे. Nashik Administration Action Mode

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.