नाशिक : येवला-मनमाड मार्गावर मारुती इर्टिगा आणि आयशर ट्रक यांच्या धडक होऊन झालेल्या भीषण अपघात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (दि.21) पहाटे 5 वाजेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेतील मृतांमध्ये 3 महिला, 2 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत अशी माहिती आहे. nashik accident yeola manmad road six died ahmednagar family
अनकाई बारी जवळील ही दुर्घटना असून मृत व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील असल्याचे समजते आहे. मृतदेह जवळील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान आयशर ट्रकच्या ड्रायव्हरने घटनास्थळावरून पलायन केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये अर्टिगा कारचा अक्षरशः चुराडा झाला. शिवाय, मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेऊन अपघातग्रस्त गाड्या वेगळ्या करण्यात आल्या. मृत्युमुखी पडलेले सर्व जण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवासी होते.
कोपरगाव शहरातील बाबा पान स्टॉलचे मालक हे बाबा अनाड नावाने प्रसिद्ध आहेत. या दुर्घटनेत त्यांची पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि नातू या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. इंदुर(मध्य प्रदेश) हून माघारी येत असताना हा अपघात झाला.
मृतांची नावे
बाळासाहेब मुरलीधर अनाड ( वय 60 वर्ष)
इंदूबाई बाळासाहेब अनाड ( वय 55 वर्ष)
श्रीनाथ बाळासाहेब अनाड ( वय 25 वर्ष)
मोहिनी गणेश खांदवे (वय 35 वर्ष, तेलीखुंट,नगर)
हरी गणेश खांदवे ( वय 5 वर्ष )
भीमाबाई बापू रोकले ( वय 70 वर्ष)