ylliX - Online Advertising Network

राजकारण्यांनी बळकावल्या मनपाच्या ५००कोटींहून अधिक रु. शेकडो इमारती,मुंढे करणार कारवाई

नाशिक : मनपा आयुक्त आता सरळ सरळ आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, राजकीय वरदहस्त असलेले त्याच्यावर कारवाई करणार आहे. त्याचे कारणही महत्वाचे असून त्यानुसार मनपाच्या मालकीच्या ९०० इमारतींपैकी जवळपास सातशे जागा कोणताही करार न करता बळकावल्या आहेत. विशेष म्हणजे या जागांचा उपयोग करत पैसे कमावले जात असून, नागरिकांना आर्थिक भूरदंड होत आहे. त्यात मनपाचा देखील आर्थिक फटका बसत असून , मात्र जागा बळकावणारे पैसा कमवत आहे. या कमाईचा कोणताही हिस्सा मनपाच्या तिजोरीत पडत नाहीये, त्यामुळे आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना जोरदार धक्का देणार असून या जागा ताब्यात घेणार आहेत.Nashik Aayukt tukaram mundhe strike nmc own buildings hold others 

महापालिकेच्या महत्वाच्या इमारती, वास्तू नगरसेवक व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संबंधीत संस्थानी बळकावल्यासारखी स्थिती आहे. मनपाच्या मालकी असेलेल्या खुल्या जागा, समाजमंदिरे, अभ्यासिका, व्यायामशाळा, सभागृह व्यापारी गाळे अशा नऊशे वास्तू आहेत. यापूर्वीचे आयुक्त प्रवीण गेडाम यांनी याविषयी सर्व्हेक्षण पूर्ण केले होते. या सर्वे नुसार विद्यमान, माजी नगरसेवक, राजकीय पक्षांचे नेते , पदाधिकारी त्यांचा बे रोकठोक वापर करत आहेत.

नाशिकच्या दोन आमदारांनी मराठा आरक्षण आंदोलन समन्वयकाडे राजीनामे सोपविले

मराठा आरक्षण मुद्द्यावर राजीनाम्यांचा फार्स, हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामे स्विकारता येत नाही

मात्र मनपाच्या या जागांसाठी मात्र नागरिकांना विविध कारणासाठी या वास्तू भाड्याने दिल्या जातात हे आता उघड झाले आहे. मात्र महापालिकेला त्यातील दमडीही दिली जात नाही. या आगोदर अश्या मनपाच्या मालकीच्या चौदा वास्तू ताब्यात घेतेल्या आहे. तर अद्याप 729 वास्तू महापालिकेशी कोणताही करार न करताच या नेते मंडळींनी ताब्यात आहेत. या वास्तूंची किंमत ५०० कोटीच्या वर आहे. Nashik Aayukt tukaram mundhe strike nmc own buildings hold others 

कारवाई झाल्यास जुन्या तारखेनुसार व सध्याच्या रेडीरेकनर नुसार भाडेआकारणी होणार आहे. या वास्तू ताब्यात ठेवणाऱ्या नेत्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. Nashik Aayukt tukaram mundhe strike nmc own buildings hold others 

Stay Updated Locally : NashikOnWeb WhatsApp Group : https://chat.whatsapp.com/8Y4rF0ioa954F7uoqTrh3H

नाशिकच्या दोन आमदारांनी मराठा आरक्षण आंदोलन समन्वयकाडे राजीनामे सोपविले

मराठा आरक्षण मुद्द्यावर राजीनाम्यांचा फार्स, हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामे स्विकारता येत नाही

Nashik Aayukt tukaram mundhe strike nmc own buildings hold others
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.