नाशिक : विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिक विधानपरिषद मतदारसंघासाठी आज शंभरटक्के मतदान झाले. सुरवातील चार तासांमध्ये १७.८६ टक्के मतदान, १२ वाजेपासून २ पर्यंत वाढून ते ६८ टक्के तर उर्वरित चार वाजेपर्यंत १०० टक्के मतदान झाले आहे. Nashik 100% voting Vidhan Parishad Election BJP NCP alliance ShivSena
नाशिकमधील तीनही उमेदवाराचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद झाले. येत्या गुरुवारी (दि.२४) मतमोजणी होणार आहे.
नाशिकमध्ये भाजपने राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आघाडीला पाठिंबा दिला आहे. Nashik 100% voting Vidhan Parishad Election BJP NCP alliance ShivSena
शिवसेनेतून बडतर्फ झाल्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवारी करणाऱ्या शिवाजी सहाने यांच्याकडे भाजप आमदार, शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहाने यांची मतदान केंद्रावर भेट घेतली आहे. काही बहाजापा नेत्यांनी मतदान झाल्यानंतर सहानेंची गळाभेट देखील घेतली आहे. त्यामुळे हा पाठींबा उघडपणे दिसून आला. मनसेनेही मराठा कार्ड खेळत राहुल ढिकले यांच्या नेतृत्वात आणि राज ठाकरेंच्या आदेशाने राष्ट्रवादीला पाठींबा जाहीर केला होता.
भाजपने उघडपणे सहाने यांना पाठींबा दिला असून, त्यामुळे शिवसेना अडचणीत सापडली आहे. शिवसेनेकडून नरेंद्र दराडे तर मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती परवेज कोकणी यांनी अपक्ष निवडणूक लढवली. Nashik 100% voting Vidhan Parishad Election BJP NCP alliance ShivSena
पालघर निवडणुकीत भाजपच्या दिवंगत खासदारांच्या मुलाला शिवसेनेकडून पालघर लोकसभा मतदार संघाची उमदेवारी देण्यात आहे. त्यामुळे दुखावलेल्या भाजपने अखेरपर्यंत नाशिकमध्ये शिवसेनेला पाठींबा जाहीर केला नव्हता. मतदानाच्या आदल्या रात्री पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठींबा जाहीर केला. Nashik 100% voting Vidhan Parishad Election BJP NCP alliance ShivSena
गुरुवारी २४ तारखेला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी पार पडणार आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जयंत जाधव मोठ्या वादातून निवडून आले होते, तेव्हा त्यांच्या विरोधात शिवसेना उमदेवार शिवाजी सहाणे होते. समान मते पडल्याने चिट्ठी पद्धतीने जयंत जाधव यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली होती. नंतर सहाणे यांनी न्यायालयीन लढाई दिली परंतु कार्यकाल संपेपर्यंत त्यांना त्यात यश आले नाही.
या निवडणुकीत खास अजित पवार यांनी लक्ष दिले आहे.
Nashik 100% voting Vidhan Parishad Election BJP NCP alliance ShivSena
Connect with Us on Whats App : 8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).
Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb
Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb
Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/
आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com