NASA nashik नासा कडून नाशिकच्या सई जोशीची या पदाकरीत म्हणून निवड

शहरातील खगोल मंडळाची सदस्य सई जोशी हिची नासातर्फे  नागरी वैज्ञानिक (सिटीझन सायंटिस्ट) म्हणून निवड झाली आहे. या निवडीमुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. नासा संस्थेच्या वतीने जूनमध्ये लघुग्रह संशोधनासाठी नागरी वैज्ञानिक प्रकल्प आयोजित के ला होता. हा प्रकल्प नासाकडून अनुदानित आहे. त्यात खगोल मंडळाची सभासद असलेली सई हिने भाग घेतला होता. NASA nashik

तिने केलेल्या संशोधनामध्ये सहा लघुग्रहांचा शोध नासा आणि हवाई वेधशाळेतर्फे  अधिकृतपणे मान्य झाला आहे. सईसोबत १३ जणांचा गट बनविण्यात आला होता. या प्रकल्पात पहिल्या पाच दिवसांमध्ये संशोधन कसे करायचे, याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. प्रकल्पामध्ये अमेरिके तील स्टार वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीचा सॉफ्टवेअरच्या मदतीने अभ्यास के ला गेला.

निवडलेल्या गटातील प्रत्येक व्यक्तीने महिनाभर सात कृतींचा अभ्यास के ला आणि सुमारे ५० संभाव्य लघुग्रहांची यादी नासाच्या आंतरराष्टीय खगोलीय शोध सहयोग संस्थेला दिली. त्यानंतर आठवडाभर वेधशाळेने या संभाव्य लघुग्रहांचा अभ्यास केला.

तिच्यासोबत अजून १३ जणांचा गट बनविण्यात आला. या प्रकल्पामध्ये पहिल्या पाच दिवसांमध्ये संशोधन कसे करायचे याविषयी प्रशिक्षण दिले गेले. प्रकल्पामध्ये अमेरिकेतले हवाई राज्यातल्या स्टार वेधशाळेकडून मिळालेल्या डेटासेटचा सॉफ्टवेअरच्या मदतीने अभ्यास केला गेला.

या इमेजेसवर नासाने प्रक्रिया केली होती. निवडलेल्या गटातील प्रत्येक व्यक्तीने महिनाभर एकूण सात इमेजेसचा अभ्यास केला आणि सुमारे पन्नास संभाव्य लघुग्रहांची यादी नासाच्या आंतरराष्ट्रीय खगोलीय शोध सहयोग संस्थेला दिली.

त्यानंतर आठवडाभर वेधशाळेने या संभाव्य लघुग्रहांचा अभ्यास केला आणि त्यापैकी सहा नवीन लघुग्रहांचे संशोधन निश्चित केले व अधिकृत शोध म्हणून जाहीर केले आहे. पुढे ६ ते १० वर्षामध्ये नासामधील शास्त्रज्ञ या लघुग्रहाची कक्षा, त्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर, त्यांची रचना अशा अनेक गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणार आहे. NASA nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.