नांदूरमध्यमेश्वर : तीन दिवसीय बर्ड फेस्टिवल : देश विदेशातील पक्षी निरीक्षण

नाशिक :नाशिकचे पर्यटन क्षेत्रात नाव व्हावे यासाठी वन विभागही सरसावला आहे. यामध्ये देशात आणि विधेशातील पक्षी स्थलांतरीत पाणथळ जागेवरील पक्ष्यांचे एकप्रकारे अरण्य असललेल्या देशभरात प्रसिध्द असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदा तीन दिवसीय पक्षी संमेलनाची आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक पक्षी निरीक्षकांना येथील पक्षी शास्त्रीय दृश्य माहिती घेत पाहता येणार आहेत.

शाळा-महाविद्यालयाच्यां विद्यार्थ्यांना पक्ष्यांची जैवविविधता लक्षात यावी, जेणेकरून निसर्गाचा दागिणा असलेल्या पक्ष्यांविषयी आवड निर्माण होईल, या उद्देशाने प्रथम पक्षी संमेलन आयोजित करत असल्याची माहिती वनसंरक्षक एन.आर.प्रवीण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संमेलनप्रमुख सहाय्यक वनसंरक्षक भरत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे उपस्थित होते.

नाशिक शहरापासून जवळपास  तीस किलोमीटरील चापडगाव पक्षी निरिक्षण केंद्र नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य म्हणून देशात  प्रसिध्द आहे.  नांदूरमध्यमेश्वर धरणामुळे या भागात जग्प्रून  विविध पक्ष्यांची विविध जाती येथे दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित होतात. मात्र यंदा प्रथमच नांदूरमध्यमेश्वच्या ब्रॅन्डिंगसाठी नाशिक वन-वन्यजीव प्रादेशिक विभागाच्या वतीने पुढाकार घेत  १९जानेवारीपासून बर्ड फेस्टिवल असा तीन दिवसीय  संमेलन घेतले जाणार आहे.  तीन दिवस चालणाºया या संमेलनासाठी परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून नियमीत दराने नाशिक (सायखेडामार्गे) चापडगाव थेट बससेवा उपलब्ध करुन दिली असून वन्यजीव विभागाकडून http://www.birdfestival.nashikwildlife.com सविस्तर माहितीचे स्वतंत्र वेबपोर्टल तयार केले गेले आहे.  या फेस्टिवलमध्ये  रोज सकाळ-संध्याकाळ अभ्यासकांसमवेत पक्षीनिरिक्षण शिवार फेरी काढली जाणार आहे.  सोबत सकाळी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याविषयी माहितीपर व्याख्यान दिले जाणार असून पक्षी त्यांचे निरीक्षण कसे करावे याबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारच्या सत्रान पक्षी छायाचित्रण, निरिक्षणाविषयी तज्ञ्जांचे मार्गदर्शन शिबिर असून सोबतच अभयारण्यात टिपलेल्या विविध छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुली चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. यामध्ये मात्र शाळेतील विद्यार्थी वर्गाला कोणतेही शुल्क नाही. सोबतच येथे आल्यावर नियमित पार्किंग आणि प्रवेश शुल्क असून त्यात कोणतही बदल असणार नाही असे वन विभागाने कळविले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.