ylliX - Online Advertising Network

Nandgoan farmer शेतकऱ्याची कर्जबाजरी पणाला कंटाळून आत्महत्या

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबत नसून, आता नांदगांव तालुक्यात कर्जाला कंटाळून जळगांव बु येथील शेतकरी भाऊसाहेब आनंदा सांगळे (३०) यांनी स्वत:च्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. नांदगाव येथील ही वर्षभरातील चौथी आत्महत्या आहे.(Nandgoan farmer)

सांगळे यांच्याकडे तीन वर्षापासून देना बँकेचे आणि खासगी सुमारे अडीच लाख रु पये कर्ज होते. सोबतच ते अल्पभुधारक शेतकरी होते. यावर्षी त्यांची सर्वच पिके झालेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याखाली गेली होती. त्यामुळे बँकेचे व इतर खासगी कर्ज कसे फेडणार या मोठ्या  विवंचनेत त्यांनी मन्याड फाट्याजवळील स्वत:च्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

नेहमीप्रमाणे सांगळे हे  दुपारी शेतावर गेले पण दुपारच्या जेवणाला घरी परतले नाहीत, याचा शोध त्यांचे वडील आनंदा सांगळे यांनी घेतला असता एक चप्पल विहिरीच्या जवळ तर दुसरी चप्पल विहिरीच्या पाण्यावर आढळून आली होती. पुढे शोध घेतला असता मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे.

यावेळी सर्पमित्र प्रभाकर निकुंभ व बेलेश्वर ग्रुप आणि पोलीस यांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढला. या घटनेमुळे जळगाव बु गावावर शोककळा पसरली आहे.(Nandgoan farmer)

https://www.facebook.com/NashikOnWeb/
आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.