एकाच मंडपात ‘त्याने’ दोन सख्ख्या बहिणींसोबत केलं लग्न

बऱ्याचदा लग्न करण्यापूर्वी नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी एखादी अट समोर ठेवते. अशीच एक अट ठेवणारी नांदेडची नवरी मुलगी सध्या बरीच चर्चेत आली आहे. आपल्या मतिमंद मोठ्या बहिणीशी विवाह करण्यास कोणी तयार नसल्यामुळे धाकट्या बहिणीने मनाचा मोठेपणा दाखवला. माझ्याशी लग्न करायचं असल्यास मोठ्या बहिणीशीही लग्न करावं, अशी अटच तिने घातल्यामुळे युवकाने दोघी बहिणींशी विवाह केला.

नांदेडमध्ये बिलोली तालुक्यातील कोटग्याळ गावात ३ मे रोजी हा आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. गंगाधर शिरगिरे या अल्पभूधारक शेतकऱ्याला तीन मुली आहेत. मोठी मुलगी धुरपता ही जन्मापासून आजारी असायची. आतापर्यंत दोन एकर शेती विकून वडिलांनी तिच्यावर उपचार केले. धाकटी मुलगी राजश्री हिच्यासाठी स्थळाची पाहणी सुरु होती. तिच्या आत्याचा मुलगा साईनाथ उरेकर याच्यासोबत राजश्रीचा विवाह ठरला. मतिमंद बहिणीसोबत लग्न केलं तरच आपण लग्नाला तयार आहोत, अशी अट राजश्रीने साईनाथला घातली. त्याने ती अट मान्य केली आणि एकाच मंडपात या दोन्ही बहिणीचा विवाह तरुणासोबत थाटात संपन्न झाला.

Advertise With us, Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.