ylliX - Online Advertising Network

मोदींना रजंनीकांतही घाबरत असेल; मुख्यमंत्र्यांनी सांगावे मोदी विदर्भातही समुद्र आणतील

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा टोला

नाशिक : हिंदुस्थानात अनेक ठिकाणी जेथे समुद्र नाही तेथे तेल रिफायनरी आहेत. नाणार प्रकल्पाचा विषय शिवसेनेसाठी संपला असून शिवसेनेने नाणार प्रकल्प जमीन अधिग्रहणची अधिसूचना रद्द केली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत आम्ही हा विषय संपवला आहे. त्यामुळे हा प्रकल्प विदर्भात घेऊन जा. मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या पोकळ गप्पा मारण्याऐवजी ठोस योजना राबवाव्या, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला. nanar refinery project uddhav thackeray shivsena bjp modi fadnavis rajnikant

मुख्यमंत्री म्हणतात विदर्भात समुद्र नाही. त्यांनी हे मोदी यांना सांगावे. ते विदर्भात सुध्दा समुद्र आणतील, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लगावला. तसेच, आता रजनीकांत सुध्दा मोदींना घाबरतो, अशी मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी केली.

कर्नाटक निवडणुकीबाबत काय बोलले उद्धव ठाकरे ? इथे वाचा :

सीमा भागात मराठी माणूस निवडून यावा, फुटीचे राजकारण नको – उध्दव ठाकरे

उत्तर महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघांचा आढवा घेण्यासाठी ठाकरे हे रविवारी (दि.6) नाशिक दौर्‍यावर आले होते. उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या लोकसभानिहाय बैठका झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. nanar refinery project uddhav thackeray shivsena bjp modi fadnavis rajnikant

भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी माझी भेट घेऊन हा प्रकल्प विदर्भात होऊ शकतो, हे अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. देशमुख यांना मुख्यमंत्र्यांपेक्षा माझ्यावर अधिक विश्‍वास वाटतो असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांची एकदा शाळा घ्यावी, अशी टीका त्यांनी केली.

तसेच, आमची शक्ती वेगळी झाली म्हणजे त्यांची शक्ती वाढेल असा भ्रम काँग्रेस, राष्ट्रवादीला झाला आहे. आघाडी झाली म्हणून शिवसेना युती करेल असे होणार नाही. दोन्ही कॉंग्रेसचे मन किती जुळले हे माहीत नाही पण ‘लकवा’ मारलेले दोन्ही हात एकत्र आले, या शब्दात त्यांनी आघाडीचा समाचार घेतला. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत स्वबळाचा ठराव झाला आहे हे सांगत शिवसेना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वळावरच लढवेल, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सेना नेते संजय राऊत, राज्य सहकार मंत्री गुलाबराव पाटील, राज्य ग्रामविकास मंत्री दादा भुूसे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते. nanar refinery project uddhav thackeray shivsena bjp modi fadnavis rajnikant

शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिक निवडणुकीची वाट बघत आहेत – उद्धव ठाकरे.

आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा शिवसेनेचा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीनेच घेतला आहे. आता शिवसेना लढण्याच्या तयारीत असून, तमाम शिवसैनिक निवडणुकीची वाट बघतायेत, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी युती करण्याचा विषयच नसल्याचे ठामपणे सांगितले.

nanar refinery project uddhav thackeray shivsena bjp modi fadnavis rajnikant

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.