तो निघाला कुऱ्हाड घेवून वार करत तिघांची केली हत्या तर ५ जखमी
नाशिक : नांदगाव येथे माथेफिरूने कुऱ्हाडीने वार करत तिघांची हत्या करण्यात आली आहे. तर या हल्यात तिघे जखमी झाले आहेत. हा सर्व प्रकार नांदगाव तालुक्यातील हिंगण देहरे गावात हा प्रकार घडला आहे. यामध्ये मानसिक रुग्णाच्या हल्यात हा प्रकार झाला असल्याचे प्राथमिक तरी समोर आले आहे.
या प्रकरणात या माथेफिरूने मांगु पवार (५१), केशव कचरू बागुल (६० ) तर सुभाष शिवाजी बच्छाव (५६) यांची हत्या केली आहे.माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची रुग्णालयात तपासणी करण्यात येत आहे.
आज सकाळी संशयित रविंद्र पोपट बागूल (२५ ) हा तरुण आज सकाळी गावात कुऱ्हाड घेवून निघाला होता. त्यामुळे गावात दहशत निर्माण झाली होती. गावातील नागरिकांनी पोलिसांना लगेच फोन केला होता. मात्र याच काळात त्या इसमाने तिघांची वार करत हत्या केली आहे. तर इतर लोकांवर त्याने हल्ला केला त्यात तर 5 ते 6 जण जखमी झाले आहेत.
जखमींना नांदगाव इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मानसिक रुग्णाला ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये गावातील नागरिकांनी सांगितले की हा मनोरुग्ण आहे. पोलिस तपास करत आहेत. प्रकारामुळे हिंगण देहरे गावात खळबळ उडाली आहे.