ylliX - Online Advertising Network

नाशिक विधानपरिषद निवडणूक : शिवसेनेचे दराडे 1६७ मतांनी विजयी; भाजप तोंडघशी

नाशिक :विधान परिषद द्विवार्षिक निवडणुक 2018 अंतर्गत नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. मतमोजणी अंती निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना विजयी घोषित केले.एकूण 644 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 631 मते वैध ठरली.  उमेदवाराला विजयासाठी 316 मतांची आवश्यकता होती. नरेंद्र दराडे यांना  399 तर राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांना 232 मते मिळाली. अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांना एकही मत मिळाले नाही. निवडणूक निरीक्षक म्हणून महावितरणचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पराग जैन यांनी काम पाहिले.स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांचे निकाल आज जाहीर झालेत. अमरावती आणि चंद्रपुरात भाजपानं बाजी मारली असून, नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तसेच कोकणातील जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपा 2, सेना 2, राष्ट्रवादी 1 जागांवर विजयी झाले आहेत. Nahsik Legislative Council Election Shivsena Darade Won defeating NCP Sahane

सर्व पक्षीयांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या नाशिकच्या या निवडणुकीत सर्वाधिक चुरस दिसून येईल असा अंदाज बांधला गेला होता मात्र दराडे यांनी जवळपास एकतर्फी म्हणावा असा विजय मिळवला आहे.२१ मे रोजी झालेल्या मतदानात एकूण ६४४ पैकी १००% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यात १३ मते बाद ठरविण्यात आली. म्हणजेच ६३१ मते वैध ठरविण्यात येऊन विजयासाठी ३१६ मतांचा कोटा ठरविण्यात आला होता. Nahsik Legislative Council Election Shivsena Darade Won defeating NCP Sahane

या निवडणुकीचे थोडक्यात विश्लेषण :

ऐनवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश भाजपच्या सदस्यांनी उधळून लावल्याचा विश्लेषकांचा अंदाज खरा ठरला आहे. तसेच ऐनवेळी आयात केलेला उमेदवार डोईजड ठरू नये त्याचबरोबर नव्या लोकांचे वर्चस्व वाढण्याची भीती यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांचीही मते फुटल्याचा अंदाज व्यक्त झाला होता. Nahsik Legislative Council Election Shivsena Darade Won defeating NCP Sahane

पालघर निवडणुकीत शिवसेनेने धोकेबाजपणा केल्याचा आरोप करत भाजपने राष्ट्रवादीला पाठींबा जाहीर केला होता. मात्र हा प्रयत्न इथे फासल्याने पालघर लोकसभा निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष असून तेथेही शिवसेने मुसंडी मारल्यास राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात  बदलण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी निवडणुकीपूर्वीचा सर्व घटना नाशिक जिल्ह्यातील सर्वच नागरिकांच्या डोक्यात अजूनही ताज्या आहेत. सहनेंची हकालपट्टी, शिवसेनेत दराडे यांचे आगमन, सहाणे यांना मराठा क्रांती मोर्चाचा पाठींबा, भाजपच्या विश्वासावर  अपक्ष परवेझ कोकणी भरलेला अर्ज आणि ऐनवेळी भाजपने वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रवादी उमेदवाराला दिलेला पाठींबा असा सर्व घटनाक्रम होता. याचे सविस्तर विश्लेषण NashikOnWeb वर लवकरच… Nahsik Legislative Council Election Shivsena Darade Won defeating NCP Sahane

असा आहे महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकांचा निकाल :

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था
शिवसेना – नरेंद्र दराडे (३९९ मतं)
राष्ट्रवादी – शिवाजी सहाणे (2३२  मतं)
शिवसेना 193 मतांनी विजयी

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था
राष्ट्रवादी – अनिकेत तटकरे (421 मतं)
शिवसेना – राजीव साबळे (221 मतं)
राष्ट्रवादी 200 मतांनी विजयी

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था
शिवसेना – विप्लव बाजोरिया (256 मतं)
काँग्रेस – सुरेश देशमुख (221 मतं)
शिवसेना 35 मतांनी विजयी

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था
भाजपा – प्रविण पोटे-पाटील (458 मतं)
काँग्रेस – अनिल मधोगरिया (17 मतं)
भाजप 441 मतांनी विजयी

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था,,,,,
भाजपा – रामदास आंबटकर (550 मतं)
काँग्रेस – इंद्रकुमार सराफ (462 मतं)
भाजप 88 मतांनी विजयी

Nahsik Legislative Council Election Shivsena Darade Won defeating NCP Sahane

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi, Name and Place  and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.