नाशिक : प्रेयसी, तिची मुलगी व नात यांना जिवंत जाळून ठार मारून फरार झालेल्या जलालुद्दीन अली मोहम्मद (५६) याला उत्तर प्रदेशातील अलिगढ येथून पकडण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी न्यायालयाने सोमवारी त्याला २३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.murder three people police lastly caught murderer uttarpradesh nashik
या घटनेमध्ये पंचवटीतील कालिकानगरमध्ये संगीता देवरे राहत होत्या. जलालुद्दीनसोबत अनैतिक संबंधातून त्यांचा वाद झाला. याचवेळी संगीता यांची मुलगी प्रीती शेंडगे, प्रीतीची मुलगी सिद्धी (नऊ महिने) हे संगीताकडे राहण्यासाठी आले होते. गेल्या ६ ऑगस्टला पहाटेच्या सुमारास जलालुद्दीनने या तिघींना पेटवून दिले. यात सिद्धीचा जागीच मृत्यू झाला, तर संगीता आणि प्रीती यांचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्या दिवसापासून जलालुद्दीन फरार होता.murder three people police lastly caught murderer uttarpradesh nashik
पंचवटी पोलिसांच्या पथकाने त्याला मथुरा येथून अटकही केली. मात्र, नाशिकला आणत असताना रेल्वेतून तो फरार झाला होता. तेव्हापासून पुन्हा त्याचा शोध घेतला जात होता. त्याच्या शोधासाठी दोन पथके दिल्ली व अलिगढकडे पाठविण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी रात्री अलिगढजवळील बिनीपूर येथे नातेवाईकांकडे जलालुद्दीन असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याला ताब्यात घेत शनिवारी विमानाने नाशिकला आणले आहे.
murder three people police lastly caught murderer uttarpradesh nashik