पोकार कॉलनी : सराईत गुन्हेगार बाला मोरेची पूर्व वैमनस्यातून गुंडांकडून गोळ्या झाडून  हत्या

पोकार कॉलनी : सराईत गुन्हेगार बाला मोरेची गुंडांकडून गोळ्या झाडून  हत्या

नाशिक मध्ये पुन्हा पूर्व वैमनस्यातून हत्या घडली आहे. यामध्ये सराईत गुन्हेगाराची आणि खुनातील संशयिताची गुंडांनी गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून हत्या केली आहे. ही घटना दिंडोरी रोड येथील पोकार कॉलनी परिसरात घडली आहे.सविस्तर वृत्त असे की,  निखील  उर्फ बाला मनोहर मोरे या सराईत गुन्हेगाराची अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोळ्या झाडून तसेच तीक्ष्ण हत्त्याराने वार करून कलानगरमध्ये हत्या केली आहे. हे सर्व रात्री ११.३० वाजता घडले आहे.

या हत्येला पूर्वीचे प्रकरण कारणीभूत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यामध्ये भगवान सानप व गुनाजी जाधव यांच्या खुनप्रकरणातील संशयित नीलेश उर्फ बाला मनोहर मोरे होता. हा नीलेश उर्फ बाला मनोहर मोरे उभा असतांना काही हल्लेखोर दुचाकीवर आले, त्यांनी काही कळण्याच्या आता मोरे वर वार केले आणि गावठी बंदुकीतून त्याच्यावर दोन राऊंड फायर केले होते. यामध्ये मोरे हा गंभीर जखमी झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतांना नागरिकांनी आणि पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला होता.

घटनास्थळी पोलिसांना दोन काडतुसांच पुंगळ्या मिळाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त विजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम देशमुख आदिंनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रण मिळविले होते. पोलिसांनी पथके तयार केली असून लवकर आरोपी पकडले जातील आणि उत्सव काळात असे खपवून घेतले जाणार नाही असेही पोलिसांनी सांगितले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.