नाशिक : शहर बससेवेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर बससेवा परवडत नसल्याकारणाने परिवहन महामंडळाने फेऱ्या कमी करून पुढील वर्षी मार्च महिन्यात बंदच करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेला जाग आली असून ही सेवा आपल्या ताब्यात घेण्यासाठी स्वतः आयुक्तांनी अनुकुलता दर्शवली आहे.
महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी मात्र शहर बससेवा ताब्यात घेण्यास अनुकूलता दर्शविली आहे. महापालिकेने ही बससेवा पीपीपी तत्वावर किंवा भाडेतत्वावर अथवा पूर्णतः ताब्यात घेण्याविषयी चाचपणी केली जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्यात याबाबत अहवाल सादर झाल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. स्वमालकीच्या बसेस खरेदी करून बस सेवा चालविणे किचकट असून सध्या चालू असलेलीच बससेवा भाडेतत्त्वावर चालविणे अधिक सोयीचे असल्याचे मत आयुक्त कृष्णा यांनी व्यक्त केले.
गेल्या काही वर्षांत नाशिक शहर बस सेवा तोट्यात असल्याचे कारण देत, ती गुंडाळण्याचे प्रयत्न राज्य परिवहन महामंडळाकडून सुरू आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वी एसटीच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी यंदाच्या आर्थिक वर्षापर्यंतच म्हणजेच मार्च २०१८ पर्यंतच शहर बससेवा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खर्चही वासून होत नसलेल्या अनेक मार्गावरील बस फेर्या बंद करण्यात आल्या आहेत. शहरातील प्रमुख मार्गांवरील फेऱ्या महामंडळामार्फत कमी करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थी नागरिकांना मोठा झटका; शहर बस सेवा होणार बंद
शहरातील वाहतूक कोंडी, वाढत असलेली वाहनांची संख्या यामुळे सार्वजनिक वाहतूक महत्वाची भूमिका बजावणार असल्याची जाणीव असल्याचे सांगत शहरातील वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिकेकडेच असावी, असे नमूद करताना, बससेवा घेण्यासंदर्भात मनपातर्फे सल्लागाराची नियुक्ती करणार असल्याचे अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले. सल्लागार संस्थेच्या नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या असून आज (दि. ११) निविदा धारकांची प्री-बिड होणार आहे.
One thought on “महापालिका चालवणार शहर बससेवा!! तीन महिन्यात सल्लागार संस्था देणार अहवाल”