MundheEffect : नाशिककरांची तक्रार जाणार थेट अधिकाऱ्यांकडे, फिडबॅक द्वारे होणार रेटिंग

मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नाशिकच्या नागरिकांच्या तक्रार निवारण करण्याच्या प्रणालीत मोठे बदल केले असून यात अनेक नवे फीचर्स जोडण्यात आले आहेत. ते फीचर्स येथे क्लिक करून वाचा.

यातील महत्वाची बाब म्हणजे यापुर्वी तक्रारी या संबंधित कर्मचा-यांकडे निराकरण करणेकामी वर्ग व्हायच्या, तथापी नवीन कार्यप्रणालीनुसार तक्रार निराकरण करण्याची सर्व जबाबदारी संबंधित विभागिय अधिकारी व संबंधित खातेप्रमुख यांचेवर सोपविण्यात आली आहे.

तक्रार रजिस्टर्ड झाल्यानंतर संबंधित अधिका-याने तक्रार २४ तासांचे आंत बघुन कार्यवाही सुरु करावयाची आहे व तक्रार निराकरण करावयाचा कालावधी ७ दिवस इतका निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर तक्रारी पुढील वरिष्ठ् अधिका-यांकडे वर्ग होणार आहे. २४ तासांमध्ये तक्रार ओपन करुन कार्यवाही सुरु न झाल्यास तक्रार वरिष्ठ् अधिका-यांकडे वर्ग होईल, तक्रार वरिष्ठ् अधिका-यास वर्ग झाल्यास संबंधित अधिका-यास सिस्टीमद्वारे ऑटोमॅटीक कारणे दाखवा नोटीस प्राप्त् होणार आहे. त्यामुळे संबंधित अधिका-यांना तक्रारीचे निराकरण विहीत कालावधीत करावे लागणार आहे.

नाशिक महानगर पालिकेच्या तक्रार निवारण कार्यप्रणाली अद्यतनित, तक्रारीचे होणार सुलभरित्या निराकरण

यापुर्वी नागरिकांना जुन्या तक्रार निवारण कार्यप्रणालीमध्ये तक्रारीचा प्रकार तसेच सदर तक्रार ज्या विभागाशी संबंधित आहे तो विभाग Select करावा लागत होता, तथापी नवीन कार्यप्रणालीमध्ये तक्रारीचा प्रकार Select केल्यानंतर विभाग Select करण्याची गरज नसुन ती तक्रार आपोआप संबंधित विभागांकडे वर्ग होणार आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रार ही अत्यंत कमी स्टेपमध्ये दाखल करता येणार आहे.

संबंधित विभागाने तक्रारीचे निराकरण करुन ती क्लोज केल्यानंतर, नागरिक जेव्हा दुसरी तक्रार रजिस्टर्ड करतील त्यावेळेस यापुर्वी क्लोज केलेल्या तक्रारींकरीता नागरिकांना रेटींग तसेच फिडबॅक देण्याची सुविधा नवीन कार्यप्रणालीत उपलब्ध् करुन देण्यात आलेली आहे.

सदर रेटींग हे त्या तक्रार निवारण करणा-या विभागास व अधिका-यांना प्राप्त् होणार आहे व प्राप्त झालेल्या रेटींगचा आढावा वेळोवेळी वरिष्ठ् स्तरावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधितांचा Performance कसा आहे याबाबतची नोंद घेण्यात येणार आहे.

या सर्व सुविधा NMC e connect या मोबाईल अॅप वर सुद्धा उपलब्ध असणार आहेत. इथे वाचा कसे असणार आहे मोबाईल अॅप

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.