ylliX - Online Advertising Network

मुंबई आग्रा महामार्गावर गॅस टॅकरचे दोन अपघात, एक ठार

नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गॅस टॅकरचा अपघात झाला आहे. यातील एका घटनेत चांदवड तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटाच्या पायथ्याशी इंडेन गॅसचा कॅप्सूल भरलेला टँकर पलटी झाला. या अपघातात गाडी चालक जागीच ठार झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत इगतपुरी जवळ बोरटेंभे गावाच्या शिवारातील केपीजी कॉलेज समोर गॅस टॅकर व ट्रकची मध्यरात्री समोरासमोर धडक झाल्याने सुमारे दोन ते तीन तास वाहतुक ठप्प झाली.मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी जवळ गॅस टॅकर व ट्रकची मध्यरात्री समोरासमोर धडक झाल्याने सुमारे दोन ते तीन तास वाहतुक ठप्प झाली होती.mumbai aagra highway tanker accident one died on spot  


याबाबत माहीती अशी की मुंबई आग्रा महामार्गावरील बोरटेंभे गावाच्या शिवारातील केपीजी कॉलेज समोर रात्री २ वाजेच्या सुमारास मुंबईला जाणारा रिकामा गॅस टँकर (जीजे १२ एयू ९३०४) मुंबईहुन नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर विरूध्द दिशेने मुंबईकडे जात असतांना मुंबईहुन येणारी ट्रक (एमपी १३ जीए १६८४) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामुळे ट्रक रस्त्याच्या मध्यभागी आडवा पडल्याने वाहतुकीची कोंडी होऊन सुमारे दोन ते तीन तास वाहतुक ठप्प झाली. या अपघातात ट्रक चालक व क्लिनर जखमी झाला असुन त्यांना तातडीने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असुन गॅस टँकर विरूध्द दिशेने का चालला होता याचा पोलीस शोध घेत आहे. mumbai aagra highway tanker accident one died on spot  


दुसऱ्या घटनेत चांदवड तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटाच्या पायथ्याशी इंडेन गॅसचा कॅप्सूल भरलेला टँकर (जी जे १२, ए डब्ल्यू ०२५८) पलटी झाला. या अपघातात गाडी चालक जागीच ठार झाला असून वाहक गंभीर जखमी आहे. जखमी वर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, टँकर भरलेला असल्याने गॅस लीक होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली आहे.

mumbai aagra highway tanker accident one died on spot  
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.