ylliX - Online Advertising Network

मुहूरत मॉलमध्ये कपडे चोरल्याचा आरोप करीत,कामगारास बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार

एबीबी सर्कलजवळ नव्याने सुरू झालेल्या मुहूरत मॉलमध्ये कपडे चोरल्याचा आरोप करीत मॉलचे मालक आणि बाउन्सरने तेथील कामगारास दोन दिवस डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कामगाराच्या फिर्यादीनुसार, गंगापूर पोलिस ठाण्यात रितेश जैन, विनीत राजपाल, अभिषेक सिंग यांच्यासह इतरांविरोधात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल वाहुळकर (२२, रा. सातपूर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो मुहूरत मॉल येथे कामास आहे. मॉलमधील कपडे चोरीस गेल्याने कामावरील मुलांची चौकशी करण्यात आली.Muhurat Showroom Nashik

muhurt nashik

काय आहे संपूर्ण घटना –

नाशिक त्रंबकरोडवर असलेल्या मुहूर्त या रेडीमेड कपड्यांचा मॉलमधील एका कर्मचाऱ्याला मॉलमधून शर्ट चोरला या कारणावरून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. मॉल मालकाच्या सांगण्यावरून मॉलमध्ये असलेल्या बाऊन्सर्सने ही मारहाण केली आहे. या मारहाणीत कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहे. विशाल वावुळकर, असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मुहूर्त हा नाशिकमध्ये नव्यानेच सुरू झालेला मॉल असल्याने अनेक स्थानिक मुले या मॉलमध्ये काम करत आहेत. मात्र, एका शर्टच्या चोरीच्या कारणावरून विशाल वावुळकर या तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. या अमानुष मारहाणी प्रकरणी मुहूर्त मॉलचे मालक रितेश जैन, विनीत राजपाल आणि बाऊंसर अभिषेक सिंग आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक दिवस डांबून ठेवल्यानंतर 27 तारखेला रात्री त्याची सुटका झाली.

तो घरी परतल्यानंतर त्याने ही आपबिती आपल्या कुटुंबास सांगितली. त्याला उपचारासाठी कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले आणि हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तो बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी त्याचा आज जबाब घेतला. या प्रकरणी विशाल वाहुलकर याच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात रितेश जैन, विनीत राजपाल आणि अभिषेक सिंग यांच्यावर भारतीय दंड विधान ३२४, ३४२, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०२५६/२०२२)

दरम्यान ऍड. अजिंक्य गीते यांनी विशाल वाहुलकर याची रुग्णालयात जाऊन भेट घेऊन विचारपूस केली. त्यावेळी विशाल याने सर्व आपबिती ऑन कॅमेरा कथन केली. यावेळी विशाल म्हणाला “मला वरच्या पायऱ्यांवरून ओढत ग्राउंड फ्लोअरला आणलं. त्यावेळी सर्व स्टाफ आणि सिक्युरिटी जमा झाले आणि मला मारहाण केली. मला मॉलमध्ये बांधून ठेवलं होतं. मला लाकडाने, रॉडने मारहाण करण्यात आली. रात्रभर माझा छळ केला., त्यांनी मला माझ्या घरी फोन करायला सांगितला. आणि ऑडिट चालू आहे मी सकाळी घरी येईल असे सांगायला लावले. त्यानंतर मला पाहते पाच वाजेपर्यंत खूप मारलं. त्यानंतर ते मला सकाळी जेवायला ठक्करला घेऊन गेले. तेथून मला त्यांनी स्टाफ कॉटेजमध्येच बांधून ठेवलं.. मला जातीवाचक शिवीगाळही करण्यात आली. त्यानंतर मला पैशाची मागणी करण्यात आली. माझ्या आईकडून त्यांनी २० हजार रुपये घेतले.. मी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मला न्याय मिळावा”. असे त्याने या व्हिडीओत म्हटले आहे.

विशाल वाहुलकर याने चोरी केली असा संशय जर शोरूम मालकांना होता तर त्यांनी कायदेशीर पद्धतीने पोलिसांत तक्रार द्यायला हवी होती. मात्र तसे न करता अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन २४ वर्षीय युवकाला डांबून ठेवत अमानुषपणे मारहाण करणे ही गुंडगिरीच म्हणावी लागेल…. त्यामुळे अश्या जातीवादी मॉल मधून ग्राहक कपडे खरेदी करणार नाहीत अशी भूमिका घेतील त्यात नवल नाही. Muhurat Showroom Nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.