MSRTC Strike : लासलगाव डेपोचे 200 कर्मचारी संपात सहभागी

लासलगाव(वार्ताहर)समीर पठाण : लासलगाव बस डेपोतील २२४ कर्मचाऱ्यांपैकी २०० कर्मचारी आज (दि. 8) मध्यरात्री पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी झाल्याने लासलगाव डेपोतून एकही बस बाहेर पडू शकली नाही. MSRTC strike st samp lasalgaon 200 employees participated nashik increment

राज्यातील काही डेपोमधील एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वेतनवाढीच्या मुख्य मागणीसह अन्य इतर मागण्यांसाठी हा बंद पुकारला गेला आहे. काही कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन या बंदची हाक दिली आहे.

पण प्रवाशांना कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने त्यांचा खोळंबा झाला आहे. शालेय हंगामात होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची व प्रवाश्यांचीही कोंडी होण्याची शक्यता आहे. MSRTC strike st samp lasalgaon 200 employees participated nashik increment

ग्रामीण भागातून शहरात येण्याचे महत्वाचे माध्यम एस टी आहे आणि हीच वाहतूक बंद झाल्याने सारे व्यवहार ठप्प झाले आहेत.

MSRTC strike st samp lasalgaon 200 employees participated nashik increment

लासलगाव बस डेपोतून दररोज ५० बस बाहेर पडतात शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत १० बस बाहेर पडल्या त्यानंतर मात्र एकही बस बाहेर पडली नाही. MSRTC strike st samp lasalgaon 200 employees participated nashik increment

लासलगाव डेपोत वर्कशॉप व चालक, वाहक व इतर असे २२४ कर्मचारी आहेत. त्यापैकी फक्त २४ कर्मचारी कामावर हजर झालेत. उर्वरित २०० कर्मचारी कामावरच न आल्याने लासलगाव डेपोतून बाहेर जाणाऱ्या ५० बस बाहेर गेल्या नाहीत.

हे सुद्धा वाचा : नाशिक जिल्ह्यात एसटी कर्मचारी संपाला 70 टक्के प्रतिसाद, शहर बस सेवेचा बोजवारा

त्यामुळे लासलगाव डेपोचे साडेचार लाख रु उत्पन्न बुडाल्याचे डेपो मॅनेजर पी बी पद्मने यांनी सांगितले. एकही कर्मचारी कामावर आला नसल्याचे पद्मने म्हणाले.

MSRTC strike st samp lasalgaon 200 employees participated nashik increment
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.