लोकशाही: उपोषण करणाऱ्या मोदींनी शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवावे: खा. शेट्टी

नाशिक : विरोधकांनी संसदेचे कामकाज होऊ दिले नाही म्हणून पंतप्रधान मोदी यांनी एक दिवसाचे उपोषण केले होते. मोदी यांना लोकशाहीबाबत चाड असेल तर त्यांनी कॅबिनेटची बैठक घेऊन शेतकर्‍यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, असे खोचक वक्तव्य करत खा. राजू शेट्टी यांनी मोदींकडे ही मागणी केली आहे. mp raju shetty demands special farmers session pm narendra modi

‘जीएसटी’साठी विशेष अधिवेशन होऊ शकते तर शेतकरी विधेयकासाठी का नाही, असा प्रश्‍न उपस्थित करत राजकीय पक्षांना शेतकर्‍यांचा किती कळवळा आहे, या निमित्ताने हे उघड होईल, असे शेट्टी म्हणाले आहेत.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीत 193 संघटनांनी  एकत्र येत कर्जमाफीशेत मालाला हमीभाव हे दोन विधेयक तयार केली आहेत. त्यास देशातील 32 पक्षांनी समर्थन दिले आहे. विशेष अधिवेशन घेण्यासाठी राष्ट्रपतींना देखील साकडे घातले जाईल. mp raju shetty demands special farmers session pm narendra modi

mp raju shetty demands special farmers session pm narendra modi, sanman yatra suicide maharashtra loan waiver scheme लोकशाही उपोषण पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन खा राजू शेट्टी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती शेतकरी आत्महत्या कर्जमाफी हमीभाव विधेयक स्वाभिमानी नाशिक सन्मान यात्रा

तसेच 1 मे महाराष्ट्र दिनापासून राज्यात शेतकरी सन्मान यात्रा काढली जाणार असून शेतकर्‍यांनी आत्महत्या करु नये, असा संदेश या यात्रेतून दिला जाईल,अशी माहिती खा.शेट्टी यांनी दिली. मंत्रालयात आत्महत्या केलेल्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या मूळ गावापासून शहादा, जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, लातूर मार्गे उस्मानाबाद येथे यात्रेचा समारोप होईल, असे त्यांनी सांगितले. धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र हे देखली यात्रेत सहभागी होतील.

दिवसातून दोन सभा, शेतकर्‍यांसमवेत चर्चा व बैठकीवर भर दिला जाणार असून 1 मे महाराष्ट्र दिनी गावोगावी सभा घेऊन संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीचे ठराव संमत केले जाणार आहेत. येत्या दहा मे ला 1857 च्या उठावाला 161 वर्ष पूर्ण होत असून या निमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दुष्काळग्रस्त मराठवाडा व पश्‍चिम विदर्भात गावोगावी जाऊन शेतकर्‍यांची भेट घेऊन आत्महत्या करणार नाही, असे शपथपत्र लिहून घेईल, असे त्यांनी सांगितले. mp raju shetty demands special farmers session pm narendra modi

शेतकरी संघटनातील दुफळीबाबत विचारले असता प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी या प्रश्‍नाला बगल दिली.

mp raju shetty demands special farmers session pm narendra modi

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.