स्त्री भ्रूणहत्या प्रकरण : खा. सुप्रिया सुळेंनी घेतली जिल्हारुग्णालयातील डॉक्टरांची भेट

नाशिक : नाशिकमध्ये घडलेल्या स्त्री भ्रूणहत्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांची भेट घेवून सदर प्रकरणाबाबत माहिती घेतली. या प्रकरणात आरोपी असलेल्या डॉक्टरांना अजून अटक का करण्यात आली नाही असा प्रश्नही त्यांनी केला. या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

तत्पूर्वी दुअप्री झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस व राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस या प्रकरणावर शांत असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात पक्षाकडून का आवाज उठवला नाही यावरून संबंधितांना प्रश्न विचारणार असल्याचे स्पर्श केल्यानंतर जिल्हा रुग्णालयाला भेट दिली.

महाराष्ट्रातील स्त्रीभ्रूण हत्यांविषयी सर्वात मोठी मोहीम राष्ट्रवादी कॉंग्रेसणे चालवली असल्याबद्दल सुळे यांनी स्पष्टीकरण दिले. याबाबत संपूर्ण माहिती आपणास देईन मात्र या प्रकरणी जिल्ह्यातील नेतृत्वाने कोणतेही लक्ष घातले नाही याबाबत दिरंगाई केल्याबद्दल माहिती घेऊन कारवाई करण्याचे सुतोवाच केले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.