ylliX - Online Advertising Network

आता चोर करत आहेत मोबाईल स्नॅचिंग

चोरांनी आता सोनसाखळी चोरी बरोबर आता नवीन चोरी अर्थात मोबाईल स्नॅचिंग  सुरु केले आहे. यामध्ये जसे मंगळसूत्र अथवा सोन साखळी चोरी केली जाते आणि वेगवान गाड्या वापरून चोरी होते.तीच पद्धत आता चोरांनी ठेवली आहे. त्यामुळे आता नाशिककरांना मोबाईल रस्त्यावरून बोलताना सुद्धा लक्ष ठेवावे लागणार आहे.
पोलीसांनी केलेल्या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.रस्त्यावरून पायी जात असतांना भ्रमणध्वनीवर बोलणारे, वाहन चालवितांना भ्रमणध्वनीवर बोलणाऱ्या  लक्ष्य करत दुचाकीवरून पाठीमागुन येत  भ्रमणध्वनी चोर त्या व्यक्तीच्या बेसावधपणाचा फायदा घेत त्याचा भ्रमणध्वनी हातोहात लंपास करत होते. पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित भीमबहादुर उर्फ रमेश शिरपाली (२१, रा. पंचवटी), कैलास गायकवाड (२०, रा. पंचवटी) आपल्याकडील चोरीचा सामान विकण्यास अंबड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी सापळा रचत संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे १० महागडे भ्रमणध्वनी, बजाज पल्सर, एफझेड दुचाकी अशा दोन दुचाकी एकुण दोन लाख ४० हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.