ylliX - Online Advertising Network

BJP MLA मनमाड नाशिक दरम्यान भाजपचे दोन आमदारांचे मोबाईल व वस्तू चोरीला

मनमाड नाशिक दरम्यान भाजपचे दोन आमदारांचे मोबाईल व वस्तू चोरीला गेल्याचे तक्रार लोहमार्ग पोलिसात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.BJP MLA

याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे प्रवासात भाजपच्या दोन आमदारांचे मोबईल चोरीली गेल्याच्या घटना घडली. या दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी व प्रवासी रेल्वे गाडीतील असल्यामुळे रेल्वे प्रवासात होणाऱ्या चोरीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पहिली घटना देवगिरी एक्स्प्रेस मध्ये घडली. या रेल्वेतून परभणीच्या आमदार मेघना साकोरे – बोर्डीकर या प्रवास करत होते. त्यांचा मोबाईल या प्रवासात चोरीला गेला. या चोरीप्रकरणी मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये घडली. या रेल्वेतून नांदेड येथील भाजप आमदार राम पाटील रातोळीकर हे प्रवास करत होते. चोरट्यांनी मनमाड येथे त्यांचा व पीएचा मोबाइल लंपास केला. तर सहप्रवाशाची कॅश असलेली पर्सही चोरली. ही बाब नाशिक येथे लक्षात आली. त्यामुळे हा गुन्हा नाशिक रेल्वे पोलिसांनी दाखल केला. या चोरी प्रकरणात मालेगाव येथून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण, त्यांच्याकडून आमदारांचा मोबाइल मिळाला नाही. त्यांच्यासोबत असणाऱ्या पीएचा मोबाइल व सहप्रवाशांकडून चोरलेली कॅशची पर्स मात्र या चोरट्यांकडून मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रेल्वेतील चोऱ्या पुन्हा चर्चेत

आठ दिवसात या दोन्ही घटना घडल्या असून, रेल्वे प्रवासादरम्यान चोरी होण्याचे प्रकार नवीन नाहीत. या अगोदर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीचे देखील प्रवासादरम्यान चोरट्यांनी पाकीट लंपास केले होते. माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांचे मनमाड येथे चोरट्यांनी पाकीट लंपास केल्याने चर्चेला उधाण आले होते. चक्क आता आमदारांचे मोबाइल चोरीला गेल्यामुळे पुन्हा रेल्वेच्या या चोऱ्या चर्चेत आल्या आहेत.BJP MLA

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.