मनसेच्या ज्येष्ठ नगरसेविका सुरेखा भोसले यांचे निधन

राज ठाकरेंच्या खंद्या समर्थक हरपल्या

नाशिक : राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यावर ज्या समर्थकांनी राज यांना साथ दिली त्यातील ज्येष्ठ नगरसेविका राज यांच्या समर्थक सुरेखा रमेश भोसले याचं कॅन्सरने निधन झालं. त्या 63 वर्षांच्या होत्या. त्यांचे पुतणे नितीन भोसले हे मनसेचे माजी आमदार आहेत. MNS Senior Councilor Surekha Bhosale passes away

यामध्ये जेव्हा महापालिका निवडणुका झाली तेव्हा अनेकांनी मनसे पक्षाला सोडचिट्ठी दिली होती. जवळपास 40 पैकी तब्बल 27 नगरसेवकांनी पक्ष सोडला होता. तर काहींनी अन्य पक्षांकडून निवडणूक लढवणं पसंत केलं होते.  मात्र सुरेखा भोसले पक्षा सोबत राहिल्या आणि त्यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्या चार वेळा नगरसेवका म्हणून निवडून आल्या आहेत.  मात्र मात्र याच वेळी त्यांना कर्करोगाचं निदान झाले आणि  त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली आहे.  सुरेखा भोसले यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

नुकतेच राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत विचारपूसही केली होती.

सुरेखा भोसले 1997 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून निवडणूक लढवून महापालिकेत प्रवेश केला, त्यानंतर फेब्रुवारी 2017 पर्यंतच्या निवडणुकीत त्यांनी चार वेळा नगरसेवकपद भूषवलं.गेल्या पंचवार्षिकमध्ये नाशिक मनपात मनसेची सत्ता होती, त्यावेळी त्या सभागृह नेत्या होत्या. याव्यतिरिक्त त्यांनी प्रभाग समिती अध्यक्ष, महिला बाल कल्याण समिती, स्थायी समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.