ylliX - Online Advertising Network

raj thackeray राज ठाकरे यांच्यावर असे सुरू आहेत उपचार डॉक्टर यांनी दिली माहिती

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray corona test positive)  यांच्या घरात कोरोनाने (corona) शिरकाव केला आहे. राज यांच्यासह त्यांच्या आई आणि बहिणीला कोरोनाची लागण झाली आहे.  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या मिळालेल्या माहितीनुसार राज यांच्यासोबतच त्यांची बहीण आणि आई यांनादेखील कोरोनाची लागण झालेली आहे. सध्या राज यांच्यावर डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येस असून तीन तासानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी खुद्द डॉ. पारकर यांनी ही माहिती दिलीय.mns president raj thackeray tested corona positive admitted to lilavati hospital know what doctor says

राज ठाकरे तीन तासांत घरी जाणार 

“त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या बहिणीलाही कोरोनाची लागणी झाली आहे. दोघेही रुग्णालयात दाखल झाले आहेत. आम्ही त्यांना मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल दिले आहे. ते तीन तासांत घरी जातील. त्यांना घरीच क्वॉरन्टाईन केले जाईल. त्यांच्या आईदेखील रात्री रुग्णालयात आल्या होत्या. त्यांनाही आम्ही अँटिबॉडी कॉकटेल दिले आहे. तीन तासानंतर राज यांना घरी सोडले जाईल,” अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे.raj thackeray

मोनोक्लोनल अँटिबॉडी काय आहे ?

मोनोक्लोनल अँटिबॉडी हे औषध कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येत आहे. यामध्ये दोन अँटिबॉडीजचे मिश्रण आहे. लीलावती रुग्णालयात हेच औषध राज ठाकरे यांना देण्यात येत आहे. या औषधामुळे त्यांना रुग्णालयात ठेवण्याची गरज नाही. तसेच ते लवकर बरे होतील.

राज ठाकरेंच्या मातोश्रींनी आज सकाळीच लीलावती रुग्णालयाला भेट दिली होती. यानंतर त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या आई या दोघांना करोनाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या कुटुंबातील किंवा घरातील इतर सदस्यांच्या चाचणीविषयी किंवा त्यांच्या अहवालांविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, राज ठाकरे आणि त्यांच्या आईंना करोनाची लागण झाली असून इतर सदस्यांपासून त्यांनी घरातच विलगीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसेचे सर्व मेळावे स्थगित

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच सक्रिय झाले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नाशिक, पुणे या शहरांतील दौरे वाढले आहेत. 23 ऑक्टोबर रोजी भांडूपमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा स्थगित करण्यात आला आहे. तसेच राज यांचा पुणे दौरादेखील पुढे ढकलण्यात आलाय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता राज यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांना कोविड-19 संसर्गाची लागण झाली आहे. सौम्य ताप आणि लक्षणं दिसून आल्यामुळे कोविड 19 संसर्गाची चाचणी करण्यात आली होती. त्यात राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांची चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई आणइ मोठी बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे अशा तिघांचे कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात राज ठाकरे यांच्या आई आणि बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे यांनी कोरोनाची लस घेतली होती. आज राज ठाकरे यांचीही कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यानंतर अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.raj thackeray

MNSchief Raj thackeray मास्क न वापरण्याचा अट्टहास नडला ? मनसे प्रमुख राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.