नाशिक : स्वातंत्र्यदिनी नाशिकच्या कलाविश्वाचा मानबिंदू असलेल्या कालिदास कलामंदिर उद्घाटन प्रसंगी राजकीय कलगीतुरा बघावयास मिळाला. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कालिदास कलामंदिराचा पुनर्विकास करत कायापालट करण्यात आला आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपचे बहुतांश पदाधिकारी, जनप्रतिनिधी, विरोधी! शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. mns gandhigiri kalidas kalamandir inauguration ceremony bjp
मात्र मनसेच्या सत्ताकाळात या पुनर्विकासाची संकल्पना तयार करण्यात आली होती. स्मार्ट सिटीतील कामे दाखवण्यासाठी हा प्रकल्प स्मार्ट सिटीत घुसवून श्रेय लाटल्याचा आरोप मनसेतर्फे करण्यात आला. केवळ राजकीय भेदभावामुळे भाजपकडून राज ठाकरे यांना उद्घाटन सोहळ्यावेळी डावलण्यात आल्याचा आरोप करत उद्घाटनावेळी कालिदासच्या गेटबाहेर उभे राहून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्घाटनासाठी आलेल्या प्रत्येकाला गुलाब पुष्प देऊन स्वागत करत परिस्थितीची जाणीव करवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या लोकार्पणापुर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची मागणी केली होती. स्मार्ट सिटी अंतर्गत हे पुनर्विकासाचे काम झाले असले तरी मनसेच्या सत्ताकाळात या पुनर्विकासाची संकल्पना तयार करण्यात आली होती. कलावंत प्रशांत दामले नाशिकमध्ये आले असता त्यांनी फेसबुक लाइव्ह करत कालिदास प्रकल्पाची झालेली दुरवस्था मांडली होती. mns gandhigiri kalidas kalamandir inauguration ceremony bjp
त्यानंतर कलाप्रेमी राज ठाकरे यांनी त्याची तत्काळ दाखल घेत मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली आता अस्तित्वात आलेले डिझाईन तयार करून मंजुरी देखील मिळवली होती. त्यामुळे या प्रकल्पाची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने मनसेच्या सत्ताकाळात झाली असल्याचे सांगत मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या हस्ते करण्याची मागणी करण्यात आली होती.
स्मार्ट सिटी झाल्याशिवाय आयुक्त मुंढे यांना नाशकातून जाऊ देणार नाही- गिरीश महाजन
नाशिकच्या बातम्या मिळवण्यासाठी Whats App ग्रुपमध्ये सामील व्हा.
https://chat.whatsapp.com/8Y4rF0ioa954F7uoqTrh3H