मनसे प्रमुख राज ठाकरे नाशिकच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांचे नाशिक मध्ये आगमन झाले आहे. तब्बल ९ महिन्यांनी ते नाशिकला आले आहेत. नाशिकमध्ये झालेल्या पराभवामुळे राज हे नाराज झाले असे वाटले होते. मात्र आज राज हे पुन्हा एकदा नाशिकच्या दौऱ्यावर आले असून त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती.
त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आले तेव्हा राज ठाकरे सुद्धा त्यांचा सोबत खाली बसले होते. त्यामुळे सर्व कार्यकर्ते खुश झाले होते. त्यांनी सर्वांशी संवाद साधला आणि कोणाचे काय सुरु आहे ही महिती विचारली. यावेळी अनेक जुने भिडू नव्हते मात्र सुजाता डेरे, सलीम शेख, अशोक मुर्तडक आदी नेते हजर होते.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा नाशिक दौरा अखेर ठरला आहे. सत्ता गमावल्यानंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे नाशिकला येत असून, शुक्रवारी (दि.१०) सकाळी ९ वाजता पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत.
महापालिका निवडणुकीत मनसेचा पराभव होऊन फक्त ५ नगरसेवक निवडून आले आहेत. राज ठाकरे यांनी गेल्या नऊ महिन्यांत एकदाही आले नाहीत. आता राज ठाकरे यांनी पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, येत्या शुक्रवारी (दि.१०) नाशिकला चोपडा बॅक्वेट हॉलमध्ये मनसेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. त्यासाठी गुरुवारी (दि.९) रात्रीच राज ठाकरे नाशिकला मुक्कामी येण्याची शक्यता आहे.
समृद्धीचा प्रश्न राज ठाकरे हाताळणार
समृद्धी महामार्गाला शेतकरी वर्गाने मोठा विरोध सुरु केला आहे. यामुळे नाशिक नगर आणि इतर ठिकाणचे शेतकरी एकत्र आले असून सरकारचा जोरदार विरोध करत आहे. मात्र या लढाईला अजून धार येण्यासाठी समृद्धी बाधित शेतकरी राज ठाकरे यांना भेटणार आहेत. राज यांना विनंती करून या मार्गाचा प्रश्न हाताळावा असे सांगणार आहेत.

काय आहे प्रकरण?
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध असून देखील सरकार काम करत आहे. यामध्ये मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी सरकारने जमीन संपादन करण्यास सुरुवात केली. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. त्यामुळे सरकार आणि शेतकरी यांच्यात जोरदार वाद निर्माण झाला आहे.
जमीन
एकूण वन जमीन 399 हेक्टर
एकूण शेत जमीन 17499 हेक्टर
पडीक जमीन 2922 हेक्टर
एकूण जमीन 20820 हेक्टर
खर्च
बांधकाम 24 हजार कोटी
आर्थिक अधिभार 6 हजार कोटी
भूसंपादन 13 हजार कोटी
इतर 3 हजार कोटी
एकूण खर्च 46 हजार कोटी