ylliX - Online Advertising Network

मनसेचे नाशिक शहरातील तीनही मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर

MNS candidates announced vidhansabha nivadnuk 2019 nashik

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असताना निवडणूक लढवण्याबाबत तळ्यातमळ्यात असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आता जोरदार तयारीला लागले असून मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या नाशिक शहरातील तीनही मतदारसंघातील उमेदवार पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील मनसेचा बोलबाला असेलेल्या इगतपुरी मतदारसंघातून मनसेने उमेदवार जाहीर केला आहे.

नाशिक पूर्व मधून अशोक मुर्तडक, नाशिक मध्य मधून  नितीन भोसले तर नाशिक पश्चिम मधून दिलीप दातीर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इगतपूरीतून योगेश शेवरे याना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राज यांनी राज्यभरातील मतदारसंघातील २७ उमेदवारी दिली आहे. यात मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्म पाटलांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनाही उमेदवारी जाहीर केली आहे.

मनसेचे नाशिक पूर्वचे उमेदवार अशोक मुर्तडक हे नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना दुसरे महापौर होते. तर नितीन भोसले यांची २००९ ते २०१४ पर्यंत नाशिक पश्चिम मतदारसंघातून आमदारकी भूषवून झाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पश्चिम मधून भाजपच्या सीमा हिरे यांनी पराभव केला होता. आता ते मध्य मधून नशीब आजमावतील. तर दिलीप दातीर हे गेल्या वर्षभरापासून आमदारकीची तयारी करताना दिसून येत होते. मात्र नाशिक पश्चिम मतदारसंघ युतीच्या गणितात शिवसेनेला सुटणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असताना पक्षाचा लाभ होईल यासाठी मनसेत दाखल होत थेट तिकीट मिळवले आहे.

मात्र धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षांपासून ऍड. राहुल ढिकले नाशिक पूर्व मधून निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचे ठरत नसल्याने त्यांची चलबिचल सुरु होती. आधी राज ठाकरेंचे फोटोज वापरून सुरु असलेली जाहिरातबाजी त्यांनी अचानक थांबवली. मध्यंतरी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर दोन दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. मात्र मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अभ्यंकर नाशिकमध्ये आले तेव्हाच मुर्तडक यांना तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समोर आल्याने ढिकले यांनी इतरत्र चाचपणी सुरु केली होती.

दरम्यान आजच भारतीय जनता पार्टीच्या नाशिक मध्य आणि नाशिक [पश्चिम मधील विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून अनुक्रमे देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांची कसोटी असेल. नाशिक पूर्वचा  कारण लोकांना गेल्या पाच वर्षात नाशिकसाठी काय केले याचा हिशोब द्यावा लागणार आहे.

एवढे असले तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार अजून जाहीर झाले नसल्याने लढतींत रंगात आलेली नाही. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर उमेदवार जाहीर करणार असल्याने उद्याच लढतींत अजून स्पष्ट येईल. MNS candidates announced vidhansabha nivadnuk 2019 nashik

मनसेच्या पहिल्या यादीतील २७ उमदेवारांची यादी
MNS Chief Raj Thackeray six public addressing scheduled maharashtra loksabha elections 2019 Latest Updates MNS candidates announced vidhansabha nivadnuk 2019 central east west nashikNews On Web Latest Updates City Marathi विधानसभा निवडणुक मनसे नाशिक
MNS Chief Raj Thackeray six public addressing scheduled maharashtra loksabha elections 2019 Latest Updates MNS candidates announced vidhansabha nivadnuk 2019 central east west nashikNews On Web Latest Updates City Marathi विधानसभा निवडणुक मनसे नाशिक 2

Follow this link to join my WhatsApp group NashikOnWeb.com : https://chat.whatsapp.com/JinYvQfCHIJLarUMwZiOw6

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.