ylliX - Online Advertising Network

जिल्हास्तरीय आमदार चषक कबड्डी लीगचे नाशिकला आयोजन

नाशिक जिल्हा कबड्डी संघटना व क्रीडा प्रबोधिनी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हा स्तरीय पुरुष गटाच्या आमदार चषक कबड्डी लीगचे आयोजन करण्यात आलेले आहे. २७ ते ३० जून दरम्यान स्व. मीनाताई ठाकरे इनडोअर स्टेडियम, नाशिक विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक ही स्पर्धा होईल. आमदार बाळासाहेब सानप यांच्या वाढदिवसानिमित्त सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील अव्वल १६ संघांना निमंत्रित करण्यात आले असून या संघांची ४ गटात विभागणी करण्यात येणार आहे. प्रथम साखळी पद्धतीने व नंतर बाद पद्धतीने सामने खेळविण्यात येणार आहे.

संपूर्ण स्पर्धेतील सामने मॅटवर खेळविण्यात येणार असून रोज सायंकाळी ५.०० ते ९.०० या दरम्यान प्रकाशझोतात खेळविण्यात येणार आहेत.

विजेत्या संघास ३१००० रुपये रोख व चषक, उपविजेत्या संघास २१००० रुपये रोख व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांक विजेत्या संघास प्रत्येकी ११००० रुपये रोख व चषक अशी सांघिक पारितोषिके व स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट खेळाडूस ५००० रुपये रोख व चषक व स्पर्धेतील सर्वात  उत्कृष्ट पकड व चढाईपटूस प्रत्येकी ३००० रुपये रोख व चषक अशी वैयक्तिक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

सदर स्पर्धेतून राज्य स्पर्धेसाठी पुरुष गटाच्या संभाव्य २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्याचप्रमाणे के. व्ही. एन. नाईक नाशिक कबड्डी प्रीमियर लीग साठी सुद्धा संभाव्य खेळाडूंची निवड या स्पर्धेतून केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड यांनी दिली.

निमंत्रित केलेल्या संघांनी आपली प्रवेशिका २२ जून पर्यंत संघटनेकडे द्यायची आहे. अधिक माहितीसाठी मोहन गायकवाड (मोबा. ९४२३१८४९५२), विलास पाटील (मोबा. ९५६१७१०७३१, ९३७११८६०९८), शरद पाटील (मोबा. ९९२२४२०२१७), यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आमदार जयंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीचे अध्यक्ष नगरसेवक मच्छिंद्र सानप, रुची कुंभारकर, पंचवटी विभागाच्या सभापती सौ. प्रियांका माने, राज्य संघटनेचे सहसचिव प्रकाश बोराडे, आंतरराष्ट्रीय पंच सतीश सूर्यवंशी, पंच मंडळाचे अध्यक्ष अनिल अहिरे, सचिव राजेंद्र निकुंभ, विजय बनछोडे, गौरव पाटील, भारती जगताप, आदी प्रयत्नशील आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.