नाशिकरोडला खुनाचे सत्र, अल्पवयीन मुलाला भोसकले

नाशिकरोड परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून गुन्हेगार मोकाट झाल्याचे चित्र आहे. आज (दि. २५) भरदिवसा दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जेलरोड वरील मंगलमुर्ती नगर येथे एक अल्पवयीन मुलगा तुषार भास्कर साबळे (१६) इमारतीच्या वाहनतळात बसलेला असताना त्याला भोसकण्यात येऊन ठार करण्यात आले. भरदिवसा टोळक्याने फिरत हवेतइबरही करण्यात आला. याचवेळी धारदार शस्राने भोसकून त्याचा खून करण्यात आला.

अगदीच सिनेस्टाईल पद्धतीने घडलेल्या या घटनेत एक टोळके पाच सहा इमारतींच्या परिसरात चेहऱ्यावर रुमाल बांधून घुसले. एकाचवेळी २ ते ३ चारचाकी आणि ३ ४ दुचाकी असा ताफाच त्यांचा होता. अशावेळी ते परिसरात प्रवेश करताना त्यांनी हवेत गोळीबार केला. परिसरातील नागरिकांमध्ये घाबराट पसरली होती. त्यावेळी पार्किंग परिसरात दोघे बाहेरून दुचाकीवरून घरी आले असता टोळक्याने दोघांना लक्ष्य केले. त्यात तुषार हल्लेखोरांच्या तावडीत सापडला. तुषार सोबत असलेला त्याचा भाऊ अक्षय मात्र या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. हल्लेखोरांची हिम्मत म्हणजे ते अक्षयचा पाठलाग करत त्याच्या तिसर्या मजल्यावरील घरापर्यंत पोचत त्यांनी दरवाजावर लाथाबुक्क्याही मारल्या.

हल्लेखोरांनी परिसरात येताच गोळीबार केला. ते बघण्यासाठी नागरिक बाहेर बाल्कनीत आले असता त्यांनी पुन्हा गोळीबार केल्याने दहशत पसरली आणि लोक घाबरून पुन्हा घरात परतले. याचाच फायदा घेऊन हेल्लेखोर परिसरातून पसार होण्यात सफल झाले.

नाशिकरोड परिसरात तीन दिवसांपुर्वीच एका महिलेची हत्त्या झाल्याची घटना ताजी असताना हेलेखोरांची हिम्मत किती प्रमाणत वाढी आहे हे दर्शवणारी ठरली आहे.

तुषार हा कसारा येथील रहिवासी होता. तो नुकताच दहावीची परीक्षा देऊन आपल्या आत्याकडे सुटी घालविण्यासाठी आला होता. हत्या होण्याआधी दोघे भाऊ बाहुबली सिनेमा बघून घरी परतत होते.

पोलीस यंत्रणा आपल्या कामाला लागली असून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली असून हल्लेखोरांची ओळख पटवून घेण्यासाठी परिसरातील नागरिकांना विविध प्रश्न विचारण्यात येत आहेत. पोलिसांनी आत्तापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसून आत्तापर्यंत कोणालाही पकडण्यात पोलिसांना यश मिळाले नसून कोणत्याही प्रकारचा गुन्हाही नोंदवल गेलेला नाही. पोलीस यंत्रणा सतर्क असून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.