ylliX - Online Advertising Network

लाखो विद्यार्थी घेणार तंबाखू विरोधी शपथ , रोटरी क्लब ऑफ नाशिक, नॉर्थतर्फे विशेष मोहीम

कर्मजागृती’ नाशिक शहरातील शाळेतील लाखो विद्यार्थी घेणार तंबाखू विरोधी शपथ

रोटरी क्लब  नाशिक नॉर्थ तर्फे नाशिक  तर रोटरी क्लब ऑफ इंटरनॅशनलचा १० जिल्ह्यात जनजागृती उपक्रम२० मिनिटांची माहितीपर चित्रफित

नाशिक : नाशिक शहरात समाजसेवेसाठी कार्यरत असलेल्या रोटरी क्लब ऑफ नाशिक, नॉर्थतर्फे शहरातील सरकारी आणि खासगी शाळेतील २.५ लाख विद्यार्थ्यांची  तंबाखू विरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ इंटरनॅशनलचा १० जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमात एकूण २० लाख विद्यार्थी या उपक्रमात सहभाग नोंदवणार आहेत.  Millions students take oath antitobacco pledge Rotary Club of Nashik North Special Campaign

‘कर्मजागृती’ या उपक्रमाअंतर्गत २७ जुलै रोजी हेड अॅण्ड नेक कॅन्सर डे ( डोके आणि मानेचा कर्करोग दिवस ) असल्याने दिवसाचे महत्व समजून सांगत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना २० मिनिटांचा तंबाखू मुळे होणारे नुकसान, तोटे याबाबत सोप्या भाषेतील असलेली चित्रफित दाखवली जाणार आहे. तर तंबाखू सेवन कधीही करणार नाही याबाबत शपथ देखील घेतली जाणार आहे.

हा कार्यक्रम शालेय वेळेत सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेच्या आत संपन्न होणार आहे. या उपक्रमासाठी नाशिक मध्ये रोटरी क्लब  नाशिक नॉर्थ तर्फे विशेष प्रयत्न करण्यात येणार असून रोटरी क्लब  नाशिक नॉर्थ  अध्यक्ष मनिष ओबेरॉय यांनी पूर्ण कार्यक्रमाची आखणी केली आहे.  या उपक्रमाला राज्य शासनाने आपले सहकार्य दिले असून प्राथमिक शिक्षण संचनालय यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत परिपत्रक काढले आहे. हा कार्यक्रम अर्थात मोहीम रोटरी क्लब ऑफ इंटरनॅशनल ३०३०, सबंध हेल्थ फाउंडेशन (एस.एच.एफ.) तर्फे पूर्ण राज्या आयोजीत केला असून २० लाख विद्यार्थी या उपक्रमात सहभाग नोंदवणार आहेत.

हा उपक्रम राज्यात नाशिक सोबतच जळगाव, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वर्धा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या १० जिल्ह्यात देखील तंबाखू विरोधी जनजगृती मोहीम ‘कर्मजागृती’ राबविली जाणार आहे. याबाबतची माहिती रोटरी क्लब ऑफ नाशिक, नॉर्थचे अध्यक्ष मनिष ओबेरॉय, प्रोजेक्ट डायरेक्टर राजेश पंचाक्षरी, सचिव निखिल खोत यांनी दिली आहे. Millions students take oath antitobacco pledge Rotary Club of Nashik North Special Campaign

उदाहरण म्हणून शाळांची नावे : १. फ्रावशी अकॅॅडमी, २. किलबिल जोसेफ कॉलेज रोड ३. शासकीय मुलींची शाळा ४. जाजू हायस्कूल राजे नगर, ५. सर्व महापालिका शाळा ६. आरपी एपी विद्यालय ७. सावित्री बाई फुले स्कूल पखाल रोड 

प्रतिक्रीया :

“बाल अवस्थेतच मुलांना या भयानक तंबाखू विषयी जागृत करणे गरजेचे आहे, यासाठी नुसते बोलून नाही तर २० मिनिटांची सोप्या भाषेतील चित्रफित आम्ही त्यांना दाखवणार असून, उपस्थित बालकांसोबत आम्ही सुद्धा शपथ घेणार आहोत. हा माहितीपट तुम्ही कोणीही www.drmantri.com अगदी मोफत डाऊनलोड करू शकता आपण तो इतरांनाही पाठवू शकतो.”

– रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे, अध्यक्ष मनिष ओबेरॉय

Millions students take oath antitobacco pledge Rotary Club of Nashik North Special Campaign

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.