नाशिक : लाॅकडाऊनमधून उद्योग व्यवसायासाठी सूट देण्यात आली असून परवानगीसाठी एमआयडीसिच्या संकेतस्थळावर गर्दी होत आहे. पहिल्या दिवशी नाशिक विभागात तेराशे उद्योगांनी अर्ज दाखल केले होते. राज्यभरातून अर्ज दाखल होऊ लागल्याने एमआयडीसीची वेबसाईट हँग झाली आहे. MIDC Website Hang Lockdown
राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या धोरणानुसार गेल्या 28 दिवसांपासून बंद असलेल्या उद्योगक्षेत्राला सुरू करण्याबाबत परवानगी देण्यात आली असून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राज्यभरात उद्योजकांची चढाओढ सुरू झाली आहे. परिणामी एमआयडीसीने सुरू करणे केलेल्या परवानगीसाठीची वेबसाईट देखिल बंद पडली आहे.
आज सकाळपासून नव्याने परवानगी मागणारे उद्योगांची अडचण निर्माण झाली असून वेबसाइटवरून अर्ज अपलोड होत नसल्याने उद्योजकांची एमआयडीसी कार्यालय भोवती गर्दी वाढली होती.
याबाबत तांत्रिक विभाग मुंबईहून दुरूस्ती काम करीत असून लवकरच प्रश्न सुटेल असे आश्वासन प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी उद्योजकांना दिले.
दरम्यान उद्योगांनी परवानगी मिळाल्यानंतर उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजनाला प्रारंभ केला आहे. उद्योगाच्या परवानगी मध्येच कामगारांना कंपनीत ठेवण्याची व्यवस्था करणे अथवा बस किंवा मिनीबस ची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या नियोजनातही कंपनी उद्योजक व्यस्त झाल्याचे चित्र आहे. MIDC Website Hang Lockdown