ylliX - Online Advertising Network

MeToo : शिक्षिकेसह तिघांविरोधात PSIसानप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

सानप यांच्या पत्नीने केली तक्रार

नाशिक : पोलिस खात्याला धक्का देणारे पहिले #MeToo #मीटू प्रकरण नाशिकमध्ये उघड झाले होते. त्याबाबत महिलेने पोलिस निरीक्षका विरोधात बलात्कारही तक्रार दाखल केली होती. हे समजताच आरोप करण्यात आलेल्या अधिकाऱ्याने आत्महत्या केली. metoo psi suicide wife complained

आतामात्र या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून मृत संशयित असलेले पोलिस उप-निरीक्षक यांच्या पत्नीने पोलिसात फिर्याद दिली असून, माझ्या पतीला महिला तसेच तिचा पती आणि अन्य एकाने भीती – दबाव निर्माण करत आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार केली आहे. त्यामुळे आता पोलिसांन पुढे तपासाचा पेच निर्माण झाला आहे.

सविस्तर वूत्त असे की, पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या करणारे आणि मी-टू अंर्तगत त्याच्या विरोधात पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेले मुंबईतील मृत पोलीस उपनिरीक्षक साजन सानप यांच्या पत्नी शैला साजन सानप यांनी बलात्काराचा आरोप करणारी महिला शिक्षिका, तिचा पोलीस उपनिरीक्षक पती व त्याची प्रेयसी अशा तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दाखल केलीय. या गंभीर प्रकरणी नाशिकमधील उपनगर पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. metoo psi suicide wife complained

साजन सानप psi sajan sanap suicide metoo
साजन सानप

साजन सानप यांच्याविरोधात बलात्काराची फिर्याद देणारी ३५ वर्षीय शिक्षिका व तिचा पोलीस उपनिरीक्षक पती यांचे संगनमत होते. त्यांनी १ जानेवारी २०१५ ते २७ नोव्हेंबर २०१८ या काळात वेळोवेळी घरी भेट देत असत. संशयित शिक्षिका यांनी साजन सानप यांच्याकडे अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती. मात्र ती साजन यांनी पूर्ण केली नाही. त्यामुळे शिक्षक महिला व तिचा पती हे ब्लॅकमेल करीत होते. तसेच बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात दाखल करण्याची धमकी देत होते. metoo psi suicide wife complained

संगनमताने कट रचून पतीच्या अज्ञात प्रेयसीच्या मोबाईलवर असलेले खोटे-नाटे संभाषण मिळवून पती साजन सानप यांच्यावर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पती साजन सानप यांची सामाजिक प्रतिमा खराब करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे तक्रारीत सांगितले आहे.

#MeToo प्रकरण महिलेची तक्रार, पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या (Exclusive Update)

त्यामुळे नेमके काय प्रकरण आहे, महिलेवर अत्याचार झाला की त्यांनी अधिकाऱ्याला धमकी देत आत्महत्या करायला भाग पाडले याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.

metoo psi suicide wife complained

(बातमी मजकूर कॉपी किंवा जसे आहे तसा किंवा साधर्म्य आढळलं तर कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.)

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.