ylliX - Online Advertising Network

Corona Medicines Available Nashik : कोरोनावरील इंजेक्शन्स, औषधे जिल्ह्यात उपलब्ध

माधुरी पवार : वाजवी दरात उपलब्ध करुन द्या

अन्न व औषध प्रशासन विभागाने करोनावर उपचारासाठी लागणारी इंजेक्शन, जिल्ह्यातील 40 औषध विक्रेत्यांकडे अाहे. त्याचबरोबर करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांतील मेडीकल ऑक्सिजन पुरवठ्याची आणि त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची प्रशिक्षित तंत्रज्ञ, अभियंते यांच्यामार्फत तपासणी करण्याच्या व ते वाजवी दरात सहज उपलब्ध करून देण्याच्या सूचना ऑक्सिजन पुरवठादारांना दिल्या असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी दिली आहे. Corona Medicines Available Nashik

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या संसर्गावर उपचाराकरिता लागणारी रेम्डीसीवर व टॉसिलिझुमॅब इंजेक्शन्स, फॅबीफ्ल्यु टॅब्लेट ही औषधे रुग्णांना उपलब्ध व्हावीत याकरीता दररोज त्यांच्या उपलब्ध साठ्याची माहिती संकलित करून जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठविण्यात येत आहे.

तसेच ही औषधे ज्या मेडीकल्समध्ये उपलब्ध आहेत त्यांचे संपर्क क्रमांक वेळोवेळी प्रसिद्ध केले जात आहेत. कोरोना उपचाराकरीता नेमलेल्या सर्व रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सहज आणि समान तसेच वाजवी दराने उपलब्ध करण्याबाबत दक्ष राहावे अशा सूचनाही शहरातील ऑक्सिजन उत्पादकांना देण्यात आल्या आहेत. Corona Medicines Available Nashik

सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून करोना रुग्णालयात मेडीकल ऑक्सिजन उपचार पद्धतीसाठी लागणारी उपकरणे योग्यरीत्या काम करीत आहेत की नाही, याबाबतचे पर्यवेक्षण करण्याच्या सूचना ऑक्सिजन उत्पादकांना, पुरवठादारांना देण्यात आल्या आहेत. संसर्ग झालेल्या बहुतेक रुग्णांना मेडीकल ऑक्सिजन उपचार पद्धतीची गरज भासत आहे.

सदर उपचार पद्धतीसाठी लागणारी उपकरणे व इतर साहित्य योग्य व प्रभावीपणे वापरणे गरजेचे आहे. मेडीकल ऑक्सिजन उपचार पद्धतीदरम्यान उपकरणांची जोडणी, ऑक्सिजन फ्लोर रेट व उपलब्ध मेडीकल ऑक्सिजनचा साठा, रिकामे झालेले नळकांडे तत्काळ पुनर्भरणासाठी उत्पादकांकडे पाठवणे इत्यादींसाठी प्रशिक्षित तंत्रज्ञ अभियंते यांच्यामार्फत पर्यवेक्षण होणे गरजेचे आहे.

या सर्व बाबी विचारात घेता खबरदारी म्हणून रुग्णालयातील मेडीकल ऑक्सिजन उपचार पद्धतीसाठी लागणाऱ्या उपकरणांची तपासणी जैववैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षित तंत्रज्ञ अभियंते यांच्यामार्फत करण्यात यावी व तसा अहवाल अन्न व औषध प्रशासन विभागात सादर करण्यात यावा, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी संबंधीत रूग्णालये व ऑक्सिजन पुरवठादारांना दिल्या आहेत. Corona Medicines Available Nashik

औषधनिहाय पुरवठादार

टॉसिलिझुमॅब इंजेक्शन

1. द विजय फार्मा प्रा.लि
9371530890

2. श्री. स्वामी समर्थ एजन्सी
9776744000

3. रूद्राक्ष फार्मा
9518314781

4.पुनम एन्टरप्राईजेस
9921009001

5. महादेव एजन्सी
9822558283

6. चौधरी ॲण्ड कंपनी
9822478462

7. हॉस्पिकेअर एजन्सी
9689884548

8. महाविर फार्मा डिस्ट्रीब्युर्स
9422271630

9. ब्रम्हगिरी एन्टरप्राईजेस
9765114343

10. सरस्वती मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स
9422259685

11. सह्याद्री डिस्ट्रीब्युटर्स
9923410293

रेम्डीसीवर इंजेक्शन

सोहम मेडिकल
9822846124

संजीवन मेडिकल
9822624228

राजेबहाद्दर मेडिकल
7350851014

भावसार मेडिकल
9405578774

स्टार मेडिकल
9028712116

ग्लोबल मेडिकल
8308491495

ॲपेक्स वेलनेस फार्मा
8668820639

पॅनिशिया मेडिकल
9090626624

व्होकार्ट हॉस्पिटल
9763339842

सुदर्शन मेडिकल
7350030031

श्री ओम मेडिकल
7378677070

फॅबिफ्ल्यु टॅब

सोहम मेडिकल
9822846124

रॉलय केमिस्ट
9422998561

संजीवन मेडीकल
9822624228

पिंक फार्मसी
9325420201

पी के मेडिकल
9225119991

वैष्णवी एन्टरप्राईजेस
9850890400

राजेबहाद्दर मेडिकल
7350851014

स्टार मेडिकल
9028712116

भावसार मेडिकल
9405578774

श्री ओम मेडिकल
7378677070

ग्लोबल मेडिकल
8308491495

ॲपेक्स वेलनेस फार्मा
8668820639

पॅनेशिया मेडिकल
9090626624

व्होकार्ट हॉस्पिटल
9763339842

सुदर्शन मेडिकल
7350030031

श्री स्वामी समर्थ एजन्सीज
9767544000

सिध्दीविनायक मेडिको
9823724817

सुमंगल मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स
9011960393

Medicines and injections effective on covid19 corona available in nashik city district 40 medical list remdesivir tocilizumab injection fabiflu tablet

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.