Mayor Nashik शिवसेनेचे नगरसेवक गेले बाहेर, महापौर निवडणूक

राज्यातील सत्ता संघर्ष आता मनपात पोहोचला असून, पहिला मोठा खेळ हा नाशिकमध्ये होणार आहे. कारण भाजपकडून महापौर पद काढून घ्य्यायचे असे पूर्ण शिवसेनेन ठरविले असून, शिवसेनेचे ३४ नगरसेवक सुद्धा नाशिक सोडून एकत्र बाहेर गेले आहे. यामध्ये विशेष असे की भाजपा सोडून शिवसेनेंत दाखल झालेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे भाजपतील समर्थक नेमकी काय भूमिका घेणार हे लवकरच उघड होणार आहे. Mayor Nashik

नाशिकमधील भाजपचे नगरसेवकांच्या सहलीचा प्लॅन आखण्यात आला आहे. परंतु, यातही 7 नगरसेवकांनी सहलीला जाण्यास नकार दिला आहे.

भाजपातून राष्ट्रवादी मार्गे शिवसेनेत गेलेल्या बाळासाहेब सानप यांचे हे 7 नगरसेवक समर्थक मानले जातात. ही शिवसेनेची खेळी असल्याची चर्चा आहे. बाळासाहेब सानप हे भाजपचे पूर्व नाशिक आमदार होते. परंतु, पक्षांनं तिकीट कापल्याने त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले. आणि त्यानंतर अवघ्या 8 दिवसांत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सानप यांचा महापालिकेत प्रभाव आहे. त्यामुळे भाजपचे 14 नगरसेवक ते फोडू शकतात.

या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना सानप यांचा मोठा उपयोग करून घेऊ शकते. त्यात सध्या युतीमध्ये ठिणगी पडल्याने आता शिवसेना महापौर बसवण्याच्या तयारीत आहे. यासगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेतेपद सध्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष, मनसे यांच्या साथीनं शिवसेनेच्या हालचालींना वेग आला आहे. यात आता बाळासाहेब सानप यांची भूमिका निर्णायक असणार आहे तर गिरीश महाजन यांची कसोटी पहायला मिळणार आहे.

अनुपस्थित नगरसेवक

मछिंद्र सानप

सुनीता पिंगळे

प्रियांका माने

सुमन सातभाई

कमलेश बोडके

पूनम धनगर

विशाल संगमनेरे

नाशिक महापालिकेतील संख्याबळ

एकूण जागा 122

भाजप(स्पष्ट बहुमत)65 होते आता 64

(1 सदस्य सरोज अहिरे राजीनामा देऊन देवळाली मतदारसंघातून राष्ट्रवादी आमदार म्हणून निवडणूक जिंकली)

शिवसेना 34 होते आता 33

(1 सदस्य दिलीप दातीर यांनी राजीनामा देऊन मनसे विधानसभा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली पण पराभूत झाले)

काँग्रेस – 6

राष्ट्रवादी – 6

मनसे – 5

अपक्ष – 3

रिपाई – 1Mayor Nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.