ylliX - Online Advertising Network

Mayor Election फाटाफूट होऊ नये म्हणून भाजपचे नगरसेवक सहलीला

भाजप सोबत शिवसेनेची राज्यात तुटलेली युती आणि भाजपचे बाळासाहेब सानप यांनी बंडखोरी करत शिवसेनेत केलेला प्रवेश यामुळे बहुमतात असलेले भाजपा ने सावध भूमिका घेतली आहे. भाजपचे माजी आमदार  बाळासाहेब सानप यांचे समर्थक नगरसेवक पक्षातून फुटू नये म्हणून सोबतच शिवसेना नाशिक मनपात आघाडीला घेऊन सत्ता स्थापन करेल म्हणून भाजपने सर्व नगरसेवकांना महापौर निवडणुकी आगोदर सर्वाना सहलीला पाठवले आहे. Mayor Election

शहरातील तीन विभागातील तीन आमदारांना पक्षाने ही जबाबदारी दिली असून, जवळपास सात दिवस हे नगरसेवक सहलीला गेले आहेत.नाशिकच्या महापौरपदाची निवडणुक २२ नोव्हेंबरला होणार असून, मनपात सध्या 65 नगरसेवक असल्याने भाजपाचे बहुमत असून एकहाती सत्ता आहे.

मात्र, राज्यातील नव्या सत्ता समीकरणाप्रमाणे शिवसेनेचे 34, काँग्रेस- राष्ट्रवादीचे 12, मनसेचे 5, अपक्ष 3 आणि रिपाई आठवले गटाचा 1 असे सर्व एकत्र झाल्यास 55 अशी नगरसेवक  संख्या होणार आहे.त्यामुळे भाजपाचे सहा नगरसेवक ऐनवेळी  फुटल्यास किंवा मतदानास अनुपस्थित राहिल्यास मनपात  सत्तांतर होण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे भाजपाने दखल घेत आज सर्व नगरसेवकांना सहलीला पाठविले आहे. मात्र, 7 नगरसेवकांनी सहलीवर जाण्यास नकार दिल्याने भाजपाचे धाबे दणाणले आहे.हे सर्व जण अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारलेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असून, सानप सध्या शिवसेनेत गेले आहेत.

नाशिक महापालिकेत महाशिवआघाडी तयार करण्यासाठी शिवसेनेनेच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे भाजपने सावध भूमिका घेतली आहे.महापौरपदाची निवडणूक येत्या २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या संदर्भात महापालिकेच्या नगरसचिवांनी विभागीय आयुक्त राजाराम माने यांना सादर केला होता.

तो विभागीय आयुक्तांनी मंजूर केला असून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाला जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या.

नाशिक महापालिकेतील सद्यपरिस्थिती

एकूण जागा 122 ,  

भाजप (स्पष्ट बहुमत) : 66 होते आता 65 (सरोज अहिरेंचा राजीनामा, देवळाली मतदारसंघातून राष्ट्रवादी आमदार म्हणून निवडणूक जिंकली)

शिवसेना : 34 (1 सदस्य दिलीप दातीर यांनी राजीनामा देऊन मनसेमधून विधानसभा निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला.)

काँग्रेस : 7 , राष्ट्रवादी काँग्रेस : 7 , मनसे : 6 , रिपाई : 1 Mayor Election

Share this with your friends and family

You May Also Like

2 thoughts on “Mayor Election फाटाफूट होऊ नये म्हणून भाजपचे नगरसेवक सहलीला

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.